टीम मंगळवेढा टाईम्स ।
देशाची भावी तरूण पिढी व्यसनमुक्त व सजग बनावी या उदात्त हेतूने मंगळवेढा पोलीस स्टेशन व वारी परिवार मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.३१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत दामाजी चौकामध्ये दारू नको दूध पिऊया या व्यसनमुक्तपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदरच्या उपक्रमाचे यावर्षीचे हे सातवे वर्ष असून यावेळी २०० लीटर मोफत मसाला दुधाचे वाटप करण्यात येणार आहे.
एक पाऊल व्यसनमुक्त समाजाचे हे ब्रीद वाक्य घेऊन पुढे निघालेल्या वारी परिवाराने मंगळवेढा तालुक्यात व्यसनाच्या आहारी गेलेल्या अनेक तरूणांच्या व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केलेले आहेत
देशाची युवा पिढी जेवढी निरोगी व सशक्त आहे तितकाच तो देश सामर्थ्यवान मानला जातो परंतु आजचे युवक पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत असल्याने ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी दारू पिण्याचे प्रमाण वाढत आहे,
दारू पिऊन गाडी मारण्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे, तसेच दारूच्या व्यसनामुळे शरीरिक व मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे त्याचे प्रतिकूल परिणाम येणाऱ्या भावी पिढीवर होऊ नये,
तसेच राष्ट्र सामर्थ्यवान बनून युवक ध्येयवादी बनण्यासाठी वारी परिवार व मंगळवेढा पोलीस स्टेशन यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यावेळी दारू पिण्याचे तोटे व दुध पिण्याचे फायदे सांगण्यात येणार आहेत, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी दामाजी चौकात मसाला दुध पिण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन मंगळवेढा पोलीस स्टेशन व वारी परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज