mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

२०२४ मध्ये कोणाचे ग्रह मजबूत! देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या वाढदिवशी ज्योतिषतज्ज्ञांची कुंडलीवरून महत्त्वाची भविष्यवाणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 22, 2023
in राजकारण, राज्य
मोठी बातमी! अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ; दादासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार? कुठले नेते फुटले? शपथ घेणाऱ्या ‘या’ आमदारांची यादी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

महाराष्ट्राच्या राजकारणात सतत होणारी उलथापालथ पाहता नक्की कोणाचे ग्रह मजबूत आहेत आणि कोणाची शक्ती कमी पडतेय हेच कळेनासे झाल्याची चर्चा सध्या जनसामान्यांमध्ये रंगली आहे.

मागील काही दिवसांमध्ये अजित पवारांची बंडखोरी पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून त्यांचे ‘उप’ पद निसटणार अशा चर्चा होत्या. पण अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही फडणवीसांना आपले पद राखण्यात यश आले आणि राज्यात दोन उपमुख्यमंत्री विराजमान झाले.

योगायोगाने या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फक्त पदच नव्हे तर वाढदिवसही आज एकाच दिवशी आहेत. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या कुंडलीनुसार येणारे नवे वर्ष त्यांच्यासाठी काय घेऊन येऊ शकते याचा आढावा घेऊया.

देवेंद्र फडणवीस आणि २०२४..

२०२३ या वर्षात महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक वाढावी आणि तरुण वर्गाची नोकरी व व्यवसायात भरभराट व्हावी ह्यासाठी देवेंद्र फडणवीस विशेष प्रयत्न करताना दिसतील. तसेच महिलांचे सबलीकरण आणि सशक्तीकरण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असेल.

त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्यास २०२४ मधील निवडणुकीत भाजपला देवेंद्र फडणवीस यांच्या जनमानसातील ‘प्रतिमे’वर व काही अंशी युतीमुळे भरघोस यश लाभू शकते.

२०२३-२४ दरम्यान फडणवीस यांच्या महाराष्ट्रातील कामगिरीवर आणि त्यांची पक्षावरची निष्ठा व समर्पण ह्यांमुळे पक्षश्रेष्ठींकडून त्यांचे विशेष कौतुक होईल. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी पक्ष त्यांच्यामागे भक्कमपणे उभा राहताना दिसत आहे. यंदा येणाऱ्या अडचणी फडणवीस सांघिक प्रयत्नातून सहजच लीलया पेलतील.

पक्षकार्यकर्त्यांपासून पक्षश्रेष्ठींपर्यंत, तसेच सर्व प्रकारच्या विरोधकांशी त्यांचे सामंजस्यपूर्ण संबंध हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे असे दिसते आहे. याच कौतुकातून फडणवीसांवर दिल्लीत मोठी जबाबदारी सोपवण्याचा विचार होऊ शकतो.

लोकभावना आणि उद्दिष्टांची पूर्ती ह्यांची सुयोग्य सांगड घालताना राजकारणात सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न ते या वर्षात करतील. महाराष्ट्राच्या इतर लोकनेत्यांपेक्षा एक जास्त कणखर व्यक्तिमत्व म्हणून फडणवीस पुढे येतील.

महाराष्ट्राबरोबरच राष्ट्रहित जपणे या त्यांच्या विशेष गुणामुळे विरोधक त्यांच्यावर अनेकप्रकारे चिखलफेक करताना दिसतील. यंदा त्यांना विरोधी पक्षातल्या विरोधकांबरोबरच पक्षांतर्गत विरोधकांनाही तोंड द्यावे लागेल असे दिसतंय. वेळप्रसंगी ते विरोधकांना समजवून घेताना दिसतील, आणि तशीच वेळ आल्यास प्रसंगी अतिकठोर निर्णय घ्यायलाही ते मागेपुढे पाहणार नाही.

दरम्यान, २०२४ हे वर्ष लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे आहे, येत्या काळात फडणवीस-शिंदे -पवार ही युती कायम राहणार का हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.

२०२४ मध्ये अजित पवार यांना सत्तेचा. उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी ज्योतिषांची महत्त्वाची भविष्यवाणी

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात मोठी बंडखोरी करून अजित पवार आमदारांसह बाहेर पडले आणि भाजप- शिवसेनेशी हातमिळवणी करून सत्तेत सामील झाले.

योगायोग असा की, महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज एकाच दिवशी आहे. याच निमित्त आज आपण दोन्ही नेत्यांच्या कुंडलीचा आढावा घेत आहोत.

प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ जयंती अलूरकर यांनी केलेल्या विश्लेषणावरून देवेंद्र फडणवीसांचे भविष्य आपण लेखाच्या भाग १ मध्ये वाचले. आता भाग २ मध्ये उल्हास गुप्ते यांच्या विश्लेषणाच्या आधारित अजित पवार यांची कुंडली काय सांगते व येणारे वर्ष त्यांच्यासाठी कसे असेल हे पाहूया .

अजित पवार आणि २०२४.

अजित पवारांना सध्या साडेसाती सुरू असून, चंद्रा वरुन होणारे शनी भ्रमण मंगळ व प्लुटोच्या प्रतीयोगातून होत असल्याने, त्यांना वाढत्या अडचणींचा सामना सातत्याने करावा लागत आहे. सत्तेचा कारक रवी हा मूळ कुंडलीत राहूच्या केंद्रात असल्याने, एक संभ्रमाचे वातावरण सातत्याने तयार होत असते.

घेतलेल्या निर्णयात भावनिकता अधिक दिसून येते. मकर राशीत असलेल्या प्लुटोमुळे सत्तेचा कारक रवी पूर्ण बाधीत झाला आहे. मेष राशीत असलेला हर्षल हा अजित पवारांच्या मूळ कुंडलीतील गुरु-बुध यांच्या अशुभयोगातून जात असल्याने, जे ठरवले आहे, त्याप्रमाणे घडून येत नाही, तथापि, पक्षातील वाढती खदखद त्यांना थोपवू शकत नसल्याचेही दिसून येत आहेत.

दरम्यान, या वर्षाच्या म्हणजे २०२३ च्या शेवटापासून ग्रह त्यांना अनुकूलतेचे दान टाकण्यास सुरुवात करतील. दिनांक २४ एप्रिल २०२४ ला मात्र पापग्रहांना पूर्ण छेद देऊन, सत्तेचा कारक रवी एका काटेरी सिंहासनावर विराजमान होईल.

दुसरीकडे येत्या २०२४ च्या निवडणुकांसाठी अजित पवार गट हा भाजप- शिवसेना युतीचाच भाग राहणार असल्याचे सध्या तरी समजत आहे. अजित पवारांना नुकत्याच झालेल्या खातेवाटपात शुद्ध अर्थ खाते आणि पवार गटातील अन्य मंत्र्यांना सुद्धा महत्त्वाची खाती देण्यात आली आहे.

तरीही काही आमदारांकडून येत्या काळात पवारांना मुख्यमंत्री पदसुद्धा मिळू शकते अशा आशयाने शुभेच्छा व पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पवारांना एकहाती सत्ता मिळवता येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(स्रोत:लोकसत्ता)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित पवारदेवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 26, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 25, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

तळणीनंतर खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान! खाद्य तेलाबद्दल तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ‘हा’ नियम न पाळल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षा; विक्रेत्यांना गंभीर इशारा

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
Next Post
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

आरोग्य मदत! आ.आवताडे यांच्या प्रयत्नांतून दोन रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी १ लाखाची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य मदत

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा