mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच खोकला आला अन् तरुण जिवंत झाला; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक घटना; नेमकं प्रकरण काय?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 8, 2025
in आरोग्य, राज्य
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच तरुणाला खोकला आला आणि त्याला पुन्हा एकदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या त्रंबकेश्वर तालुक्यात उघडकीस आली आहे. भाऊ लचके असं या तरुणाचं नाव असून तो 19 वर्षांचा आहे.

नेमकं प्रकरण काय?

चार दिवसांपूर्वी त्रंबकेश्वर तालुक्यातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. नातेवाईकांनी त्याला त्रंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले तिथून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्यात,

मात्र बेड शिल्लक नसल्याचे कारण देत जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केले नाही, अखेर गोर गरीब आदिवासी कुटुंबीय रुग्णाला आडगावच्या डॉ वसंत पवार मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत तिथे तीन दिवस उपचार केल्यानंतर नातेवाईक रुग्णला थेट आपल्या गावी घेऊन गेलेत.

डॉ वसंत पवार रुग्णालय प्रधासानने मेंदूमृत (ब्रेनडेड) झालाय. त्यामुळे तुम्ही रुग्णला घरी घेऊन जा किंवा इथेच राहुद्या असे सांगितल्याने आम्ही घरी घेऊन गेलो असा दावा रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय.

मेंदूमृत याचा अर्थ रुग्णाचा मृत्यू झाला असा समज झाल्यानं अंत्यविधीची तयारी करण्यात आली. मात्र त्याला खोकला आल्यानं त्याची हालचाल झाली आणि तो जिवंत असल्याचे कळाले आणि पुन्हा भाऊ लचके याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

रुग्णाचे नातेवाई गंगाराम शिदे काय म्हणाले?

सध्या भाऊ लचकेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक आहे, तो व्हेंटिलेटरवर आहे. त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यावर सध्या शस्त्रक्रिया करता येणार नाही. पर्यायी उपचार सुरू आहेत.

परंतु रुग्ण ब्रेनडेड नसल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने केल्यानं यातील ट्विस्ट आणखीनच वाढला आहे. त्याच बरोबर ज्या रुग्णालयातुन त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावर कोणते उपचार करण्यात आलेत,

डिस्चार्ज देताना काय कारण देण्यात आले, याबाबतीत कुठलीच माहिती नसल्याचा जिल्हा रुग्णालयाचा दावा असून याबाबतीत सबंधित यंत्रणाकडून चौकशी केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे काय म्हणाले?

डॉ वसंत पवार हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांचे दावे फेटाळून लावले आहेत. रुग्णाचे नातेवाईकच आम्ही रुग्णला अधिक उपचारासाठी घेऊन जातो, असे सांगून घेऊन गेले, असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सांगितले.

भाऊ लचके याची नशिबाची दोरी बळकट-

रुग्णाचे आणि त्याचे नातेवाईक आदिवासी पाड्यावरील आहेत, त्यामुळे तिथे शिक्षण आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे, त्याच परिस्थितीत ते आपल्या रुग्णाचे जीव वाचविण्यासाठी नाशिक शहरात आलेत.

मात्र रुग्णालय प्रधासन आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्यात सुसंवादाचा अभाव, ग्रामीण भागातून आदिवासी पाड्यावरून आलेल्या नातेवाईकांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला, भाऊ लचके याची नशिबाची दोरी बळकट होती. त्यामुळे अंत्यसंस्कारची तयारी सुरू असताना त्याला खोकला आला आणि तो जिवंत असल्याचे लक्षात आले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉक्टर रुग्ण

संबंधित बातम्या

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार; ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय

May 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मेहनत विद्यार्थ्यांची, मलिदा चोरांचा! NEET पेपरफुटीच्या टेन्शनमुळे १९ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

May 30, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

May 29, 2026
राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! नीट पेपरफुटी प्रकरणात आला नवा द्विस्ट, परीक्षेनंतर नोट्स, कागदपत्रे रद्दीत विकली

May 25, 2026
जुलै अखेरपर्यंत राज्यातील शिक्षकांच्या बदल्या

संतापजनक! लेकराच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या…” NEET विद्यार्थ्याच्या वडिलांचा आक्रोश; सिस्टिमवर संताप

May 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

भयंकर! लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला, आईला जिवंत जाळलं; पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक

May 24, 2026
Next Post
कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

सूर्योदय अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आज आयोजन; गौरी गणपती सजावट स्पर्धेचे होणार वितरण

ताज्या बातम्या

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार; ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय

May 30, 2026
राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

मंगळवेढ्यात सुवर्णसंधी! ‘राजनंदिनी महिला ग्रामीण पतसंस्थे’त विविध पदांसाठी थेट भरती; रविवारी मुलाखती

May 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मेहनत विद्यार्थ्यांची, मलिदा चोरांचा! NEET पेपरफुटीच्या टेन्शनमुळे १९ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

May 30, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा