मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पूर्वी किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, रिक्षाचालक मित्राचा खून केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांना अटक करण्यात आली आहे. हा खून २८ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.
युवराज प्रभुलिंग स्वामी (वय २०, रा. शिवगंगा नगर, शेळगी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. युवराज स्वामी हा रिक्षा चालक होता, तो सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे रिक्षा (क्र.एमएच-१३ ५७७७) घेऊन भाडे मारण्यासाठी गेला.
तो दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास व्यवसाय करून घरी आला, भाड्यातून मिळालेले ३०० रुपये त्याने घरखर्चासाठी बहीण लक्ष्मी हिच्याकडे दिले. त्यावेळी त्याला मित्र सोनू बनसोडे याचा फोन आला.
मी बाहेर जातो असे म्हणून घरातून बाहेर पडला, पायी चालत तो मित्र विजय ऊर्फ सोनू बनसोडे व अल्पवयीन मुलगा या दोघांच्या मोटारसायकलवर बसून गेला.
सायंकाळ झाली तरी युवराज परत न आल्याने वडील व भाऊ नागेश यांनी शोध घेतला. रात्री १०.३० वाजता तो व त्याचे मित्र नेहमी बसत असलेल्या निर्मल डेव्हलपर्सच्या मोकळ्या जागेत गेले तेव्हां युवराज स्वामी हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.
या प्रकरणी नागेश प्रभूलिंग स्वामी (वय १८ रा. शिवगंगा नगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून विजय ऊर्फ सोनू बनसोडे (वय १९ रा. आदर्श नगर, शेळगी) व अल्पवयीन मुला विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
दारूच्या नशेत केला खून
तिघे एकमेकांचे मित्र होते, मात्र यापूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणांवरून वाद झाले होते. रात्री दारू पिण्याचे नियोजन करून तिघे दुपारीच मोटारसायकलवर गेले होते. दारू पित असताना पूर्वीच्या भांडणाचा विषय तिघांमध्ये निघाल्यानंतर त्यात पुन्हा वाद झाला अन् दोघांनी स्टीलच्या स्टॅन्डने कपाळावर वार करून खून केला अशी माहिती पोलिसांनी दिली.
आज न्यायालयासमोर हजर केले जाणार
तिघेही एकमेकांचे मित्र होते, त्यांच्यात पूर्वी किरकोळ वाद झाले होते. मद्य प्राशन केल्यानंतर पूर्वीच्या कारणावरून पुन्हा वाद झाला अन् त्यात युवराज स्वामीचा खून झाल्याचे पुढे आले आहे. दोघांना अटक केली असून आज सोमवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.- शबनम शेख, पोलिस निरीक्षक, जोडभावी पेठ पोलिस ठाणे
.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज