mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बिरोबा-महालिंगराया गुरु शिष्याची आज हुलजंतीत भेट, लाखो भक्त दाखल; भाविकांच्या माहितीसाठी यात्राशेड उभा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 25, 2022
in मंगळवेढा
बिरोबा-महालिंगराया गुरु शिष्याची आज हुलजंतीत भेट, लाखो भक्त दाखल; भाविकांच्या माहितीसाठी यात्राशेड उभा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

हुलजंती ता.मंगळवेढा येथे धनगर समाजाचे आराध्य दैवत व हुनुरचा बिरोबा आणि हुलजातीचा महालिंगराया या गुरु शिष्याची भेट येथील महालिंगरायाच्या मंदिरा पाठीमागील ओढ्यात आज मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता भेट होणार आहे.

आज हुलजंती येथे आज दीड लाखाहून अधिक भाविक येथे या गुरु शिष्य भेटीसाठी व मुंडास पाहण्यासाठी दाखल झाले आहेत.

या यात्रेसाठी मोठ्या संख्येने कर्नाटक आंध्र प्रदेशातून भाविक खाजगी वाहने तसेच कर्नाटकातील एसटी बस या वाहनाने या ठिकाणी दाखल झाले आहेत.

तर महाराष्ट्र राज्य वतीने सांगली एसटी बस डेपो ने ही या ठिकाणी एस टी महामंडळाची बस थांब्याची सोय केलेली आहे.

प्रत्येक तासाला पंढरपूर मंगळवेढा या भागातून येते बस जात आहे, मात्र मंदिराकडे व गावात खाजगी वाहतुकीस प्रवेश बंदी केल्यामुळे भाविकांचे हाल होत आहे.

सोड्डी फाटा या ठिकाणी पासून दोन ते अडीच किलोमीटर महालिंगरायाचे मंदिर आहे. तसेच गावातील मंदिर आहे. त्यामुळे भाविकांना आज सोड्डी फाट्यावर उतरावे लागत आहे त्यामुळे लहान मुले सोबत आणलेले सामान घेऊन जाण्यासाठी खूप दूर बालकांना कसरत करावी लागत आहे.

रस्त्यावर मोठी गर्दी होत असल्यामुळे पोलीस खात्याने गर्दी व ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून नियोजन केले असले तरीही हे नियोजन भाविकांना त्रासदायक ठरत आहे.

मंदिर आणि उतरलेले ठिकाण हे खूप दूर असल्यामुळे त्यांना गावातून वस्तू आणण्यासाठी तसेच पाणी गॅस इतर साहित्य व नैवेद्य तयार करण्यासाठी खूप दूरवरून हेलपाटे मारावी लागत आहेत.

या ठिकाणी भाविकांसाठी श्री दासोहरत्न चक्रवती दानेश्वर आप्पाजी श्री क्षेत्र बंडीगणी तालुका बनहटी जिल्हा बागलकोट कर्नाटक यांनी गेली 42 वर्षापासून या ठिकाणी भाविकांना अन्नदान मोफत अनुदान करीत आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना तसेच पोलीस कर्मचारी व महसुल कर्मचारी यांचे भोजनाची सोय चांगली झाली आहे.

आज दुपारपर्यंत या गावांमध्ये चार लाख भाविक येण्याची शक्यता आहे, यावर्षी यात्रेचे संपूर्ण नियोजन तत्काळ प्रशासनाधिकारी तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्याकडे असल्यामुळे सर्व महसूल खात्याचे अधिकारी कर्मचारी यांनी दानपेटी तसेच हॉटेल्स जनरल स्टोअर्स खेळणी यांना दिलेल्या जागा आकारणी महसूल विभाग या ठिकाणी काम करत आहे.

यात्रेसाठी ग्रामपंचायत स्तरावर शिवाजी कुरमुते सरपंच मीनाक्षी ताई कुरमुते ग्रामपंचायत यांनी पूर्णपणे लक्ष ठेवले आहे तसेच यात्रेतील बंदोबस्तासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील तसेच पोलीस निरीक्षक रणजीत माने हेही ठाण मांडून आहेत या ठिकाणी जिल्हातील विविध तालुक्यातून पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्तासाठी दाखल झालेले आहेत.

मंगळवेढा आगाराने आगाराच्या 11 बसेस तर बाहेरून 31 बसेस मागवून एकूण 42 एस.टी.बसेसचे नियोजन केले आहे. बसस्थानक आवारात भाविकांच्या माहितीसाठी यात्राशेड तसेच हुलजंती येथेही यात्रा शेड उभा करण्यात आले आहे.

दरम्यान यासाठी मंगळवेढा येथे दोन व हुलजंती येथे दोन वाहतुक नियंत्रक व अन्य आठ कर्मचारी नेमले आहेत. यात्रा काळात भाविकांना ने आण करण्यासाठी आगारप्रमुख मधुरा जाधवर व स्थानक प्रमुख गुरूनाथ रणे हे जातीने लक्ष ठेवून आहेत.

या कालावधीत अवैध वाहतुक होवून एस.टी.च्या उत्पन्नावर पाणी पडणार नाही याचीही खबरदारी एस.टी.कर्मचार्‍यांकडून जातीने घेतली जात आहे. सध्या एस.टी.चे दर वाढल्यामुळे मंगळवेढा ते हुलजंती पाच रूपयाने वाढ झाल्याने आता ते 40 रूपये इतके झाले आहे.

दि.24 ते 26 या दरम्यान ही यात्रा भरत आहे. मंगळवेढा पोलिसांकडून यात्रेसाठी डी.वाय.एस.पी.-1, पोलिस निरीक्षक-1, सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक-13, पोलिस कर्मचारी-147, दंगा काबु पथक-1, स्टॉकिंग फोर्स-2 असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बिरोबा भेटमहालिंगराया

संबंधित बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

August 1, 2026
Next Post
नको त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमुळे हैराण झालात? सेटिंगमध्ये करा फक्त हे बदल!

WhatsApp युजर्स 'मेटा'कुटीला; कंपनीने दिलं स्पष्टीकरण; सांगितलं कधी सुरू होणार...

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा