टीम मंगळवेढा टाईम्स ।
पत्नी माहेरी गेल्याचा विरह सहन न झाल्याने तरुणाने एका गाताचीवाडी एमआयडीसी गेटच्या लगत जवळील स्लॅबच्या विशाल चौगुले खोलीच्या छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मंगळवारी (९ नोव्हेंबर) रोजी दुपारी १२ च्या पूर्वी ही घटना घडली आहे. विशाल उर्फ गोट्या विक्रम चौगुले (२२ रा.टिळक चौक बार्शी) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत रविराज सिद्राम चौगुले (४१ वर्ष रा.टिळक चौक बार्शी) यांनी दिलेल्या खबरीनुसार मयत विशाल घेऊन आत्महत्या उर्फ गोट्या विक्रम चौगुले हा दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा घरातून बाहेर गेला होता , तो रात्री घरी आला नाही.
मित्रासोबत बाहेर गेला असेल, त्याची वाट पाहून सर्व जण जेवण करून झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी ९ नोव्हेंबर रोजी त्याची शोधाशोध करीत असताना, मयताचा चुलता रविराज चौगुले यांचा मित्र मयूर सावंत यांनी फोनवरून विशालने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले.
पत्नी माहेरी गेल्याने त्याचा विरह सहन न झाल्याने त्याचे हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. याबाबत बार्शी तालुका पोलिसात गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज