टीम मंगळवेढा टाईम्स ।
युटोपियन शुगर्स लि,कचरेवाडी या कारखान्याचा ८ वा गळीत हंगाम २०२१-२२ चा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक, सोलापूर जिल्ह्याचे आमदार व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे
चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते व सर्व ऊस उत्पादक, शेतकरी, तोडणी व वाहतूक ठेकेदार यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये आज रविवार दि १७/१०/२०२१ रोजी सायंकाळी ४.०० वाजता कारखाना कार्यस्थळी आयोजित केलेला आहे.
सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे वतीने करण्यात आले आहे.
खासदार किरिट सोमय्या आज सांगोला दौऱ्यावर
भाजपचे खासदार किरिट सोमय्या हे आज रविवारी सांगोला दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते शहरातील हॉटेल अॅम्बेसडर येथे दुपारी २ वाजता भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेणार आहेत.
या बैठकीत पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीसाठी भाजपच्या सर्व मोर्चा, सेल, आघाडी व शहर , तालुका पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी प्रसिध्दीप्रमुख योगेश कबाडे यांच्याद्वारे केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज