mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

थरारक! दोन दुचाकींसह कारचा तिहेरी अपघात; मंगळवेढ्यातील बावीस वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; चौघेजण जखमी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 27, 2024
in मंगळवेढा
Breaking! पाठीमागून येणाऱ्या कारने पिकअप गाडीला उडवले, मंगळवेढ्यातील एकाचा मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

मंगळवेढा टाईम्स न्यूज ।

सांगोला-पंढरपूर रोडवरील मांजरी गावाजवळ अपघात भरधाव दोन दुचाकींची जोराची धडक होऊन कारमध्ये तिहेरी अपघातात अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या एका २२ वर्षीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात काल गुरुवार, दि.२६ रोजी दुपारी १:३० च्या सुमारास सांगोला- पंढरपूर रोडवरील मांजरी (देवकाते वाडी) पाटीजवळ घडला. सुनील संजय मोटे (वय २२, रा.मारोळी, ता.मंगळवेढा) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.

या अपघातात दोन दुचाकींवरील दोन विद्यार्थ्यांसह पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोल्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितीन काशिनाथ राठोड (रा.ब्रह्मपुरी, ता.मंगळवेढा), शुभम मोहन हाके (चळे ता.पंढरपूर), धनाजी गणपत साळुंखे यांच्यासह त्यांच्या पत्नी अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम फुले यांनी माहिती दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस हेडकॉन्स्टेबल नवनाथ कोकरे व पोलिस नाईक निशांत सावंजी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकेत उपचारासाठी सांगोल्यात पाठवून दिले व अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

अपघातानंतर जखमीस सांगोला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. तर शुभम हाके या विद्यार्थ्यांचा डावा पाय फॅक्चर झाला असून नितीन राठोड हा विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे.

त्याच्यावर उपचार करून घरी सोडले तर अपघातग्रस्त दुसऱ्या दुचाकीवरील धनाजी साळुंखेसह त्याची पत्नी जखमी झाल्याने त्यांच्यावर सांगोल्यात खासगी रुग्णालयात उपचारानंतर घरी सोडले. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल माळी करीत आहे.

दुचाकीवरून निघाले होते ट्रिपल सीट..

पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुनील मोटे, नितीन राठोड व शुभम हाके असे तिघेजण मित्र गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास सांगोल्यात मित्राला भेटून एमएच. १३, सीएन. २२६७ या दुचाकीवरून ट्रिपल सीट सांगोला-पंढरपूर निघाले होते.

त्यांची दुचाकी मांजरी गावाजवळ आली असता नेमके देवकाते वाडीकडून डाव्या बाजूने येणाऱ्या एमएच. ४५, एक्स. ४२१५ या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीवरील सुनील मोटे हा विद्यार्थी उडून पंढरपूर (संगेवाडी) कडून येणाऱ्या एमएच.१०, डीव्ही ९६७७ कारसमोर पडल्याने त्यास कारची जोराची धडक बसली. त्याच्या डोक्यास गंभीर मार लागून तो जखमी झाला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अपघात मंगळवेढा

संबंधित बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

ब्रेकिंग! सुसाट कंटेनरने दुचाकी उडवली मंगळवेवेढ्यातील शिवसेनेचा आक्रमक आणि निष्ठावंत चेहरा काळाच्या पडद्याआड

June 18, 2026
धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

माणुसकीला काळीमा! अवघ्या ३ वर्षांच्या बालिकेचा विनयभंग; मंगळवेढ्यात संताप, १७ वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

June 17, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो सावधान! नळाला कॉक लावा, अन्यथा थेट दंडात्मक कारवाई; नगरपरिषदेचा कडक इशारा

June 18, 2026
शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

June 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

जिल्हा परिषद शाळा बळकटीकरणासाठी डोंगरगावच्या सुपुत्राचे स्तुत्य पाऊल; वीर इंटरनॅशनल अकॅडमीचा आज भव्य उद्घाटन सोहळा

June 16, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढ्यात भरधाव कारचा थरार! यू-टर्न घेताना कारने दुचाकीला उडवले; शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत केले मदतकार्य

June 16, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

मंगळवेढा पोलीस ठाण्यात मोठे फेरबदल! ५ कर्मचाऱ्यांची बदली, तर ५ नवीन अंमलदार रुजू; पहा कोणाची कुठे झाली बदली?

June 15, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मंगळवेढ्यात खळबळ! तुकाराम मुंढेंच्या धसक्याने स्वीट मार्टमधील मलाई, पेढा अन् पनीर गायब; मग आतापर्यंत नागरिक जे खात होते ते काय होतं?

June 15, 2026
शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

June 15, 2026
Next Post
यंदाच्या मोसमामधील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक थंडी, कमी झालेल्या तापमानामुळे नागरिकांना भरली हुडहुडी; थंडी, कडक ऊन.. आजोबा व चिमुकल्यांना जपा

महिलांनो! लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन नोंदणी संदर्भात सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले 'हे' महत्त्वाचे आवाहन

ताज्या बातम्या

मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

ब्रेकिंग! सुसाट कंटेनरने दुचाकी उडवली मंगळवेवेढ्यातील शिवसेनेचा आक्रमक आणि निष्ठावंत चेहरा काळाच्या पडद्याआड

June 18, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सोलापुरात ‘सिंघम’ इफेक्ट! आता जनतेचाच थेट वॉच; दररोज येताहेत भेसळीच्या ढीगभर तक्रारी; सोलापूर FDA कडून दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू

June 18, 2026
रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

June 17, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

राज्य सरकारची मोठी घोषणा! महिला बचत गटांना मिळणार अडीच एकर जमीन आणि 1 लाखांचं अनुदान; काय आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये?

June 18, 2026
धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

माणुसकीला काळीमा! अवघ्या ३ वर्षांच्या बालिकेचा विनयभंग; मंगळवेढ्यात संताप, १७ वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

June 17, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो सावधान! नळाला कॉक लावा, अन्यथा थेट दंडात्मक कारवाई; नगरपरिषदेचा कडक इशारा

June 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..