मंगळवेढा टाईम्स न्यूज ।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना बुधवार, दि.२५ डिसेंबरपासून डिसेंबरचा हप्ता मिळू लागला आहे. पुढील पाच ते सहा दिवसात लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, ज्या महिलांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा नवीन महिलांसाठी योजनेची नोंदणी बंद आहे.
शासनाकडून आदेश आल्यानंतरच नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू करू, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोलापुरात जवळपास साडेदहा लाख लाभार्थी आहेत. यातील बहुतांश नावे यंदा वगळण्यात येतील, असेही अधिकारी सांगत आहेत.
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळली जातील.
यादीतून नाव कमी करण्याचे काम राज्य शासन करणार आहे. कारण राज्य शासनाकडे संजय गांधी निराधार योजनेची यादी आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही.
दुसरीकडे काही महिला प्रशासनाकडे लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करून घेण्याची मागणी करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज