टीम मंगळवेढा टाईम्स । माळशिरस:
राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यासाठी आणि बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी निघालेल्या सख्ख्या भावावर काळाने झडप घातल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

फळवणी (ता. माळशिरस) येथे झालेल्या भीषण अपघातात मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील तरुण शेतकरी अमर सिताराम पाटील (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर आणि परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?
लक्ष्मी दहिवडी येथील शेतकरी अमर पाटील हे शुक्रवारी दुपारी पिलीव येथे राहणारी बहीण दीप्ती नष्टे यांच्याकडे राखी बांधण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते.

दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास फळवणी गावाजवळ पाठीमागून आलेल्या एका भरधाव पिकअपने त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अमर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबाचा आधार हिरावला
मयत अमर पाटील यांच्या पश्चात पत्नी, दुसरीच्या वर्गात शिकणारा मुलगा आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा अशा अचानक आणि दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातानंतर मृतदेहाचे वेळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा मूळ गावी लक्ष्मी दहिवडी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सणाच्याच दिवशी घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











