टीम मंगळवेढा टाईम्स / हुलजंती
महिलांच्या आर्थिक प्रगतीला आणि स्वावलंबनाला हातभार लावण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ‘कृष्णा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लवंगी’ यांच्या नवीन शाखेचा भव्य शुभारंभ हुलजंती येथे होत आहे.
उद्या मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सत्यनारायण महापूजेने होणार असून, या शुभप्रसंगानिमित्त पतसंस्थेच्या वतीने सभासदांसाठी आणि ग्राहकांसाठी विशेष ‘शुभारंभ ठेव योजना’ जाहीर करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत १०० दिवसांच्या ठेवीवर १०% इतका आकर्षक व्याजदर दिला जाणार आहे.
ह्या मंगलप्रसंगी आयोजित सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हुलजंती व परिसरातील नागरिक, महिला आणि सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेच्या व्यवस्थापनाकडून व चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांच्याकडून करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












