टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या विकास नगरमधील निलगिरी बंगलोमधील चंदनाची तीन झाडे अज्ञात चोराने चोरून नेली.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अभिजित शिंदे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी शिंदे हे शुक्रवारी सकाळी निलगिरी बंगल्याच्या पाठीमागील लाईटचे बटण बंद करण्यासाठी गेले होते. तेव्हा लॉनमध्ये असलेले एक मोठे चंदनाचे झाड कापलेले त्यांना दिसले.
तेथे जाऊन पाहणी केली असता, चंदनाचे झाड तोडल्याचे व त्याचा बुंधा नसल्याचे त्यांना दिसले. यामुळे फिर्यादी व त्यांचे सहकारी चंदनशिवे,
संदीप हुलगे यांनी बंगल्यातील चंदनाच्या झाडांची पाहणी केली असता गेस्ट हाऊसच्या बाजूचे झाड व पाण्याच्या टाकीजवळील चंदनाचे झाड तुटलेले दिसले.त्याचाही बुंधा नसल्याचे आढळले.
यामुळे निलगिरी बंगलोमधील तीन चंदनाचे झाड तोडून त्यांचा बुंधा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत शिंदे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून अज्ञात चोरावर गुन्हा दाखल झाला असून घटनेचा तपास पोसई गायकवाड करत आहेत.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज