टीम मंगळवेढा टाइम्स ।
भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांनी आपल्या कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील अनेक तरुणांच्या हाताला काम मिळवून दिले असल्याचे गौरवोद्गार होनमोरे महाराज यांनी काढले आहे.
हुन्नूर येथे भैरवनाथ शुगर यांच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. होनमोरे महाराज श्री.गुरुदेव दत्त महाराज व इतर मान्यवरांच्या हस्ते फित कापून कार्यालयात प्रवेश करण्यात आला.
याप्रसंगी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक गौडापा बिराजदार, पंचायत समिती सदस्य नितीन पाटील, हुन्नूरचे सरपंच मच्छिंद्र खताळ, शिरनांदगीचे सरपंच गुलाब थोरबोले, सरपंच रघुनाथ पडोळकर, सरपंच सचिन मळगे,खैराव सरपंच सखाराम गुटुकडै, होळकर महमदाबाद, शेती अधिकारी कृष्णदेव लोंढे तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.
श्री.गुरुदेव दत्त महाराज बोलताना म्हणाले की, लवंगी सारख्या माळ रानावर सावंत बंधू यांनी मोठे धाडस करून कारखाना उभा केला आहे.
कारखाना उभा करत असताना त्यांनी या परिसरातील नागरिकांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्या हाताला काम मिळवून दिले आहे.
अनिल सावंत यांच्या माध्यमातून हा कारखाना चांगल्या प्रकारे सुरू आहे. शेतकऱ्यांना वेळेवर बिल देण्याची भूमिका पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज