बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला तालुक्यातील महूद येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात असणाऱ्या राधाबाईच्या विहिरीतील पाणबुडीची मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ५ जून रोजी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महूद ता.सांगोला येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी शेळी विकास प्रक्षेत्रातील राधाबाईच्या विहिरीवरील पाणबुडी ( मोटर ) चालू करण्यासाठी सुभाष नगरे गेले होते.त्यावेळी विहिरीवरील पाइप , नायलॉन दोरी व मोटारीला जोडलेला विद्युत पुरवठा कट झालेला दिसला . तसेच पाणबुडीचा पाईप पाण्यावर तरंगत असलेला दिसून आल्याने सदरची माहिती डॉ.कारंडे यांना कळवली.
अज्ञात चोरट्याने विहिरीतील पाणबुडी चोरून नेल्याने नगरे यांनी विभागातील अधिकारी , कर्मचाऱ्यांना बोलवून घेऊन मोटारीबाबत चौकशी केली असता याबाबत कोणाला काही माहिती नसल्याने आजूबाजूस असणाऱ्या शेतांमध्ये व विहिरीमध्ये पाहणी केली असता पाणबुडी ( मोटार ) मिळून आली नाही . याबाबत सुभाष नगरे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . अधिक तपास पोलिस नाईक पर्वते करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज