टीम मंगळवेढा टाईम्स । काही दिवसापूर्वी पालकमंत्री हे सोलापूरच्या दोऱ्यावर आले असताना त्यांनी अनेक खाजगी हॉस्पिटलची पाहणी करून कारवाई केली होती.तसेच ते दौरा संपवून निघत असताना एका महिलेने त्यांची गाडी अडवून दारू विकणाऱ्या लोकांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते परंतु दारू विक्री करणाऱ्यांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही हे दिसून येत आहे.
काही ठिकाणी फुटकळ दारू सर्रास विक्री केली जात आहे.कुमठा नाक्याचा काही भाग हा प्रतिबंधित क्षेत्रात येतो आणि या भागात फुटकळ दारू विक्री केल्याचे दिसून येत आहे.
अशा विक्रेत्यांवर कारवाई कधी करणार असा प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे.आधीच कोरोना रूग्णांची वाढती संख्या डोकेदुखी ठरत असताना मात्र प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक नाहीत ते देखील या प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन दारू पित आहेत.
अशाने एखादा जर चुकून बाधित रूग्ण या ठिकाणी गेला तर अनेक मोठा संसर्ग या ठिकाणी होण्याची शक्यता आहे . म्हणून वेळीच दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज