बाळासाहेब झिंजूरटे । अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या इसमावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मंडल अधिकारी व तलाठी यांना वाळू माफियांनी हल्ला करून मारहाण केली.या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींना अटक करण्यासाठी सांगोला तालुका तलाठी व महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
तहसीलदार योगेश खरमाटे यांच्या आदेशानुसार आधिकारी अवैधरित्या वाळू उपसा रोखण्यासाठी गेले होते. त्यावेळी सात वाळू माफियांनी मंडल अधिकारी नितीन जाधव , तलाठी काटकर यांच्यासह इतरांवर हल्ला करत काठी व लाथाबुक्क्याने मारहाण केली होती.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी ग्रामस्तरीय समिती , पोलीस बंदोबस्त व नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी येत नाही तोपर्यंत व्यवस्थापनाचे कामकाज ( कोरोना विषयीचे कामकाज वगळून ) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे संघटनेचे सचिव कुमार राजवाडे यांनी सांगितले.तलाठी संघटनेच्या वतीने याबाबतचे निवेदन तहसीलदार योगेश खरमाटे यांना देण्यात आले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज