टीम मंगळवेढा टाईम्स । अज्ञात कारणावरून जवळा ता . सांगोला येथील पूजा रंदवाज मागाडे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी , ९ जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पूजा रंदवाज मागाडे वय २२ रा . जवळा या विवाहितेने अज्ञात कारणावरून घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत रंदवाज मागाडे याने सांगोला पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.अधिक तपास पोलिस नाईक कांबळे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज