टीम मंगळवेढा टाईम्स । मोबाईलवरील बाळाला दूध पाजलेले फोटो दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला आपल्या मतिमंद असलेल्या पतीसमवेत राहत असून आरोपीचे पीडित महिलेच्या दिरासमवेत घरी येणे-जाणे होते.
शेतात गवत काढण्यास गेलेल्या एका २१ वर्षीय महिलेस आरोपी अमोल रामा तोरणे (रा.अरळी) याने तू जर मला शरीर संबंध ठेवू दिले नाहीत तर मोबाईलवरील फोटो दाखवून तुझी बदनामी करेन अशी धमकी देवून त्या महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपीस गजाआड केले आहे.
या घटनेची हकिकत अशी ,तामदर्डी येथील शेतकरी एकनाथ शिनगारे यांच्या ऊसाच्या शेतामध्ये यातील पिडीत महिला एके दिवशी सकाळी ११.०० वा . गवत काढत असताना आरोपी अमोल रामा तोरणे हा तेथे आला व त्याने शरीराला मिठी मारून चुंबन घेत तू जर मला शरीर संबंध ठेवू दिले नाहीत तर मोबाईलमधील फोटो सर्वांना दाखवून तुझी बदनामी करेन अशी धमकी देवून पिडीत महिलेवर अत्याचार केले असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
यापुर्वी आरोपी हा पिडीत महिलेचा दिर याचा मित्र असल्याने तो मागील तीन महिन्यापासून पिडीता रहात असलेल्या शेतात येत असल्याने ओळख झाल्याचे म्हटले आहे . पिडीतेचा पती भोळसर असल्याने ही घटना पतीला न सांगता वैराग व जत येथे असलेल्या दोन बहिणींना पिडीतेने फोन करून घटना सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
mangalwedha Atrocities on women by showing photos on mobile

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज