टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन कालावधीत मद्य विक्री बंद असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्कच्या महसुलात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १७ कोटी ८२ लाख रुपयांची घट झाल्याचे समोर आले आहे.
राज्य सरकारला मद्य विक्रीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो परंतु मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात बंद केलेली मद्य विक्री अद्याप बंदच असल्याने शासनाचा मोठा महसूल यावर्षी घटला आहे.
दरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यात देशी दारू विक्रीची अंदाजे ११७ दुकाने आहेत. ४२ वाइन शॉप आहेत. ३५0 परमिट रूम तर २५० च्या आसपास बिअर शॉप आहेत. राज्याच्या तिजोरीत गौण खनिज , मुद्रांक शुल्क आणि राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम दिली जात असते परंतु राज्य सरकारची तिजोरी भरणारे हे तीन महत्त्वाचे आर्थिक झरेच लॉकडाउन कालावधीत बंद झाल्याने राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याचे चित्र आहे.
17 crore reduction in liquor sales revenue in Solapur; A ruckus in the state coffers

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज