टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोना परिस्थितीत दिवसेंदिवस बिकट होत असल्यामुळे सीबीएसई बोर्डाची 12वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता महाविकास आघाडी सरकारने सुद्धा राज्यात 12 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल लवकरच आदेश काढण्यात येणार आहे.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते.
अखेर, राज्य सरकारने दहावीपाठोपाठ आता बारावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन विभागाची बैठक पार पडली.या बैठकीत 12वीची परीक्षा रद्द करण्याबाबात चर्चा झाली आणि प्रस्ताव मंजूर केला. आता परीक्षा रद्द करण्याबद्दल अधिकृत आदेश शासन काढण्यात येणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बोर्ड परीक्षांबाबतची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सीबीएसई (CBSE) बोर्डाची 12वीची परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
देशभरातील कोरोनामुळे झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी 12 वीच्या परीक्षा होणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करून भारत सरकारने बारावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले. परिक्षांविषयी विस्तृत सल्लामसलत केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षिता आणि त्यांचं भवितव्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यादृष्टीने आम्ही हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज