mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोदींची चिंता दूर! कोण म्हणतं मोदी लाट ओसरली? यूपीपासून मणिपूरपर्यंत मोदी मोदी मोदी; 2024 ला फिर एक बार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 10, 2022
in राजकारण, राष्ट्रीय
मोदींची चिंता दूर! कोण म्हणतं मोदी लाट ओसरली? यूपीपासून मणिपूरपर्यंत मोदी मोदी मोदी; 2024 ला फिर एक बार?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. बहुतांश ठिकाणचे कल हाती आले आहेत. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या चित्रानुसार पाचपैकी तब्बल चार राज्यांमध्ये भाजपचे सरकार येण्याची शक्यता आहे.

विशेषतः देशभरात गाजलेले उत्तर प्रदेशातील कोरोना मृत्यू, गंगेच सोडून दिलेले मृतदेह यावरून जोरदार राजकारण झाले.

मात्र, तरीही उत्तर प्रदेशमध्येही पुन्हा एकदा योगी सरकार येताना दिसत आहेत. एकीकडे मोदी लाट ओसरली, याची चर्चा सुरू होती.

मात्र, पुन्हा एकदा यूपी, उत्तराखंडपासून ते थेट गोवा, मणिपूरपर्यंत थेट मोदी आणि मोदीच दिसतायत. त्यामुळे 2024 च्या लोकसभेची देशाची गादी पुन्हा एकदा मोदींकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

उत्तर प्रदेशात कमळ फुलले

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. या ठिकाणी आतापर्यंत हाती आलेल्या कौलानुसार 273 जागा भाजपच्या खात्यात जाणार आहेत.

यावरून येथे भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असताना दिसते आहे. समाजवादी पक्षाच्या वाट्याला 119 जागा जातायत. तर बहुजन समाज पक्षाला फक्त 5 आणि काँग्रेस आणि इतरांना प्रत्येकी 3 जागा मिळतायत. लोकसभेच्या गादीचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो.

कारण उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जवळपास 80 जागा आहेत. येथे मोदींची जादू चालणे लोकसभेसाठी लाभदायक ठरणार आहे.

उत्तराखंडमध्येही 42 जागा भाजपच्या खात्यात जाण्याचा अंदाज

उत्तराखंडमध्येही 70 पैकी 42 जागा भाजपच्या खात्यात जाण्याचा अंदाज आहे. येथेही भाजप सरकार सत्तेत येऊ शकते. त्याचाही लोकसभेसाठी फायदा होणार आहे. उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या 5 जागा आहेत.

गोव्यात बाजी

गोवा आणि मणिपूरनेही भाजपला तारल्याचे चित्र आहे. गोव्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. येतथे सध्या 19 ठिकाणी भाजप येताना दिसत आहे. काँग्रेस 11, आप 2, मगोप आघाडीला 3 आणि इतरांना पाच जागा मिळतायत. गोव्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत.

मणिपूरमध्येही भाजप पुढे

मणिपूरमध्येही विधानसभेच्या 60 जागांपैकी 24 जागांवर भाजप येण्याची शक्यता आहे. तर 11 जागी काँग्रेस, एनपीपी 12 आणि इतर 13 जागांवर येण्याची शक्यता आहे.

मणिपूरमध्येही लोकसभेच्या 2 जागा आहेत. याचाही भाजपला फायदा होणार आहे.

एकंदर काय तर महत्त्वाचे असे उत्तर प्रदेश भाजपने राखले आहे. देशातील सत्तेचा मार्ग तिथूनच जातो. त्यामुळे मोदींची चिंता तूर्तास तरी दूर झालीय.(स्रोत:TV9 मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदीफिर एक बार मोदी सरकार

संबंधित बातम्या

नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 2, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला तिकीट? भाजपने ‘या’ नावांची यादी दिल्लीला पाठवली; कुणाकुणाची नावे?

April 24, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

April 24, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

​आता नाही तर कधीच नाही! परिचारकांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा की भाजप पुन्हा धक्का देणार? विधान परिषदेच्या निवडणुकीने राजकारण तापलं; पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं..

April 20, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सोलापूर जिल्हात ‘या’ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा शंखनाद; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; असा आहे निवडणूक कार्यक्रम..

April 7, 2026
Next Post
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

चार राज्यातील भाजपच्या विजयाचा ठाकरे सरकारवर परिणाम होणार? शरद पवारांचं उत्तर वाचा

ताज्या बातम्या

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

May 2, 2026
शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

May 2, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

खळबळजनक! मंगळवेढा बसस्थानकावरून २५ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; आई, तुम्ही गाडीत बसा, मी येते…असं म्हणाली अन् तरुणी गायब

May 1, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

​ब्रेकिंग न्यूज! मंगळवेढा तालुक्यात अतिक्रमण धारकांसाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय; तहसीलदार मदन जाधव यांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

May 2, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे! अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका; आयएमडीकडून हाय अलर्ट

May 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा