mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! ईडब्ल्यूएस कोट्यातून सरकारी नोकरी; मराठा उमेदवारांना हायकोर्टाचा दिलासा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 9, 2023
in राज्य
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

टीम मंगळवेढा टाईम्स ।

2019 च्या अभियांत्रिकी सेवा भरतीमध्ये सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गातून (एसईबीसी) अर्ज केलेल्या मराठा समाजातील उमेदवारांना बुधवारी उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला.

मराठा उमेदवारांना आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) दिलेली नियुक्ती बेकायदा ठरवण्याच्या ‘मॅट’च्या निर्णयाला प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. खंडपीठाने राज्य सरकार आणि मराठा उमेदवारांची सविस्तर बाजू ऐकून घेण्यास तयारी दर्शविली आहे. ‘मॅट’च्या निर्णयानंतर ईडब्ल्यूएस कोटय़ातील सरकारी नोकरी अडचणीत सापडल्याने धास्तावलेल्या मराठा उमेदवारांचे आता उच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

2019 च्या अभियांत्रिकी सेवा भरतीमध्ये मराठा उमेदवारांना एसईबीसी कोटय़ातून दिलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर अडचणीत सापडली. त्यानंतर राज्य सरकारने एसईबीसी आरक्षणाला पात्र ठरलेल्या मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस कोटय़ांतर्गत नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला,

मात्र यासंदर्भातील 12 फेब्रुवारी 2019 च्या जीआरवर आक्षेप घेत मूळ ईडब्ल्यूएस उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने ईडब्ल्यूएसच्या 111 जागांचा फैसला करण्यासाठी हे प्रकरण पुन्हा ‘मॅट’कडे पाठवले होते. त्यानुसार सुनावणी घेऊन ‘मॅट’ने एसईबीसी कोटय़ातून अर्ज केलेल्या 94 मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस कोटय़ातून दिलेली नियुक्ती बेकायदा ठरवली. या निर्णयाविरोधात मराठा उमेदवारांतर्फे अक्षय चौधरी, राहुल बागल आणि वैभव देशमुख यांनी अॅड. ओम लोणकर, अॅड. अद्वैता लोणकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.

‘मॅट’च्या 2 फेब्रुवारीच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती मराठा उमेदवारांनी केली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनेही ‘मॅट’च्या निर्णयाला आव्हान दिले आहे. याप्रकरणी बुधवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे मराठा उमेदवार आणि राज्य सरकारच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली.

यावेळी सरकारतर्फे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. ‘मॅट’चा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचे पटवून देण्यास त्यांनी तयारी दर्शवली. त्यांच्या या युक्तिवादाची दखल घेतानाच खंडपीठाने पुढील सुनावणीवेळी सविस्तर बाजू ऐकून घेतली जाईल, असे नमूद केले. तसेच त्या पुढील सुनावणीपर्यंत ‘मॅट’च्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली.

अभियांत्रिकी सेवा भरतीमधील 1143 पैकी 1032 उमेदवारांची नियुक्ती केली गेली. तथापि, एसईबीसी रद्द झाल्यानंतर ईडब्ल्यूएसच्या 10 टक्के कोटय़ातील 111 उमेदवारांची नियुक्ती अडचणीत सापडली. याबाबत 2 फेब्रुवारीला ‘मॅट’ने निकाल जाहीर केला. त्याद्वारे मूळ ईडब्ल्यूएस उमेदवारांना संधी देऊन ईडब्ल्यूएस कोटय़ाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले, तर उर्वरित 90 टक्के जागा ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश दिले. त्यावर मराठा उमेदवारांनी उच्च न्यायालयात आक्षेप घेतला आहे.

‘मॅट’ने दिलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. त्या निर्णयामुळे उच्च गुणवत्ताधारक मराठा उमेदवार केवळ ईडब्ल्यूएस कोटय़ातूनच नव्हे तर संपूर्ण भरती प्रक्रियेतून थेट बाहेर पडले आहेत. हा मराठा उमेदवारांवरील मोठा अन्याय असून ‘मॅट’च्या आदेशाला स्थगिती द्या, अशी विनंती याचिकाकर्त्या मराठा उमेदवारांनी केली आहे.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सकल मराठा समाज
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

March 25, 2023
आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ शुगर लवंगी येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कौतुकास्पद! आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत, प्रा.शिवाजीराव सावंत बंधुंनी घेतलेल्या महाआरोग्य शिबीराची इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

March 25, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

खाजगी शाळातील भरमसाठ फी प्रकरणाचा प्रश्न आ.आवताडेंनी अधिवेशनात चव्हाट्यावर आणला; मदतीला विरोधी पक्षनेतेही धावले

March 23, 2023
मंगळवेढ्यात शेतकऱ्यांची कामे ठप्प; मंडल अधिकारी व तलाठी संघाने पुकारले बेमुदत रजा आंदोलन

मोठी बातमी! जुनी पेन्शन संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; वाचा नेमकं सरकारनं काय आश्वासन दिलं

March 20, 2023
नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरण, पाच जणांवर गुन्हा दाखल; मुख्य सूत्रधाराची ओळख पटली; प्रकरणाला नवं वळण मिळणार?

नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरण, पाच जणांवर गुन्हा दाखल; मुख्य सूत्रधाराची ओळख पटली; प्रकरणाला नवं वळण मिळणार?

March 20, 2023
पंढरपूरच्या ‘या’ आश्रमात 32 वारकऱ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू; जेवणात बासुंदीही होती

मोठी बातमी! माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तिघांना घेतले ताब्यात

March 20, 2023
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

पालकांनो! शाळांमध्ये मोफत प्रवेश घेण्यासाठी अर्ज सादर करण्यात मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सादर करता येणार

March 25, 2023
एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं; निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

आजच्या सभेत लाव रे तो व्हिडीओ?; आता मुख्यमंत्री शिंदे व्हिडीओमधून उद्धव ठाकरे यांना एक्सपोज करणार?

March 19, 2023
सोलापूर जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवर पिके पाण्यात; ‘या’ तालुक्यात सर्वाधिक फटका

शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती मोबाइल क्रमांकावर पाठवावी; कृषिमंत्र्यांनी केला मोबाइल नंबर जाहीर

March 19, 2023
Next Post
Breaking! मंगळवेढा शहरातून १४ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण; अपहरणकर्त्याविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! मूल होत नसल्याने चिमुकल्याचे अपहरण; सांगोल्यातील दाम्पत्याला अटक

ताज्या बातम्या

वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मंगळवेढ्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंबाची बाग जळून खाक; डोळ्यादेखत उपजीविकेचे साधन जळत असतांना कुटुंबियांना आश्रु अनावर झाले

March 25, 2023
आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

आमदार आवताडे यांनी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याचा ‘हा’ प्रश्न मांडला विधिमंडळात; संपूर्ण महाराष्ट्रभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

March 25, 2023
अखेर विसाव्या दिवशी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी झाली ‘यांची’ नियुक्ती

सोलापूरच्या तत्कालीन SP तेजस्वी सातपुते यांच्या कामगिरीची दखल; त्यांच्या ‘या’ उपक्रमाला पंतप्रधान पुरस्कार जाहीर

March 25, 2023
आरोग्यमंत्री ना.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ शुगर लवंगी येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कौतुकास्पद! आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत, प्रा.शिवाजीराव सावंत बंधुंनी घेतलेल्या महाआरोग्य शिबीराची इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

March 25, 2023
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

March 25, 2023
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

सावधान! ‘सेलिब्रिटीज’ला फॉलो केला तर पैसे मिळतील असे सांगून चौघांनी केली फसवणूक

March 25, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा