मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या राज्यात सुरू आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शासनाने कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवत आहे. मात्र या अभियानाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महसूल विभागाच्या एका नायब तहसीलदारांनीच काळ फासला आहे.
या पठ्ठाने आपल्या मुलासाठी थेट परीक्षा केंद्रावर जाऊन कॉपी पुरवण्याचा प्रताप समोर आला आहे. एवढंच नाहीतर जेव्हा कर्मचाऱ्यांनी या तहसीलदाराला पकडलं तर त्यांच्याशीच अरेरावी करत होता.
संत भगवान बाबा ज्युनिअर कॉलेज तनपुरवाडी येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. अनिल तोडमल असं या नायब तहसीलदाराचं नाव आहे. अनिल तोडमल हे अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदारावर कार्यरत आहे. त्यांच्या मुलाचं परीक्षा केंद्र हे संत भगवान बाबा ज्युनिअर कॉलेज आहे.
आपण तहसीलदार असल्याचा आव आणत तोडमल हे थेट लेकराला कॉपी पुरवण्यासाठी कॉलेजमध्ये पोहोचले. परीक्षा सुरू झाल्यापासून तोडमल या परीक्षा केंद्रावर उपस्थित असल्याची माहिती काही स्थानिक नागरिकांना मिळाली होती.
त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कॉलेजमध्ये येऊन नायब तहसीलदार अनिल तोडमल यांना ताब्यात घेतलं. जेव्हा त्यांची चौकशी सुरू केली तेव्हा आपण तर मुलाला सोडायला आलो होतो, अशी बोलबच्चनगिरी सुरू केली.
शिक्षण विभागाने फिर्याद दिल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितलं आहे. तर, परीक्षा केंद्रावर कुणाला येण्यास मनाई असते असं असतानाही या नायब तहसीलदाराला कुणी येऊ दिलं, या दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी केली आहे.
मात्र या कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी हे वर्षभर शाळेत येत नसतात. या ठिकाणी फक्त परीक्षा घेण्यासाठी कॉलेजचा वापर होत असतो, असाही अजब आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. जिल्ह्यामध्ये अशा अनेक शाळा आणि कॉलेज आहेत. त्या फक्त परीक्षा केंद्र म्हणून वापरल्या जातात.
यामध्ये शिक्षण विभाग आणि शिक्षण संस्थाचालक यांच्यामध्ये संगनमत असल्याचं बोललं जात आहे. आजच्या या प्रकारात महसूलचे अधिकारीच जर अशा प्रकारे त्यांच्या मुलांना कॉपी पुरवत असतील तर शासनाने कॉपी मुक्त परीक्षा हे अभियान राबवलेच कशाला? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज