टीम मंगळवेढा टाईम्स ।
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काल अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, काल अजित पवारांनी लाडक्या बहिणींच्या २१०० रुपयांबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
त्यामुळे महिलांच्या पदरी निराशाच पडली आहे. दरम्यान, आता पुढचे वर्षभर तरी लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता ७-८ मार्च रोजी जमा झाला आहे. दरम्यान, यावेळीच फेब्रुवारी- मार्च अशा दोन महिन्याचे पैसे मिळण्याची शक्यता होती. मात्र, ८ मार्च महिला दिनी फक्त फेब्रुवारीचा हप्ता वितरीत करण्यात आला. दरम्यान, आता लवकरच मार्च महिन्याचाही हप्ता जमा केला जाणार आहे.
आदिती तटकरेंनी दिली माहिती
लाडकी बहीण योजनेता हप्ता ६ मार्च २०२५ ते १२ मार्च २०२५ पर्यंत देण्यात येईल. दोन टप्प्यांमध्ये ३००० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच मार्चचाही हप्ता दिला जाईल. त्यामुळे या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्चचा हप्ता जमा होईल, म्हणजेच मार्च महिन्यात एकूण ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
या महिलांना मिळणार नाही मार्चचा हप्ता
लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत ९ लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या अर्जांची पडताळणी सुरु आहे. यामध्ये ज्या महिला अपात्र आहेत त्यांनाही बाद केले जाईल. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
जवळपास ५० लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आधीच नाराज होत्या. त्यात आता २१०० रुपयांबाबत कोणतीही घोषणा न केल्याने निराशा अजूनच वाढली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज