टीम मंगळवेढा टाईम्स ।
सरपंचाच्या शेतातील लोखंडी जाळी कुंपणाच्या तारा कट करून १० शेळ्या व ६ बोकड असा सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
ही घटना काल मंगळवार, सकाळी ६ वाजतापूर्वी लोटेवाडी, ता.सांगोला येथील सातारकर वस्ती येथे घडली.
याबाबत सरपंच विजयकुमार उत्तमराव खांडेकर (रा.सातारकरवस्ती, लोटेवाडी) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
सरपंच विजयकुमार खांडेकर यांनी शेतीला पूरक व्यवसाय खिलार गाई-म्हशींसह एकूण लहान-मोठ्या २६ शेळ्या पाळल्या आहेत.
त्यांनी घरापासून सुमारे ४ किमी अंतरावर शेतामध्ये जनावरांच्या गोठ्यासह शेळ्यांना बंदिस्त करण्यासाठी लोखंडी तार जाळीचे कुंपण उभे केले होते.
दरम्यान, सोमवार ११ रोजी रात्री १०:३०च्या सुमारास त्यांनी २६ लहान- मोठ्या शेळ्यांसह बोकड कुंपण जाळीमध्ये बंदिस्त करून ते घराकडे परतले होते.
मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास नेहमीप्रमाणे ते शेतात गेले असता कुंपणामध्ये २६ शेळ्यांपैकी १६ शेळ्या व बोकड कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सालगडी रवी खंडावते असे मिळून सदर शेळ्यांचा शेतात आजूबाजूला शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज