टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढयाचे तहसिलदार स्वप्निल रावडे हे कोरोना पॉझिटिव्ह आले असून ते पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे महसूल सुत्राकडून सांगण्यात आले.
मागील आठवडयात न्यायालयीन कोठडीतील आरोपीनी गळफास घेतल्याने त्याचा मृतदेह शवविच्छेदनाला सोलापूरला नेण्यासाठी तहसिलदार रावडे हे घटना घडल्यापासून स्वतः जातीने उप कारागृहात रात्री बराच वेळ थांबले होते.
परिणामी कारागृहातील तीन कैदी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कामुळे हा कोरोना संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले.
सध्या तहसिलदार स्वप्नील रावडे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचेही सुत्रांकडून सांगण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज