mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘सूर्योदय’ने समाजातील प्रत्येक घटकांसोबत अतूट नाते जोडले; सेवानिवृत्त शिक्षक, सैनिक यांचा सहकुटुंब गौरव; सूर्योदय समूहाचे सर्व उपक्रमांचे नागरिकांकडून मनापासून कौतुक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 22, 2025
in मंगळवेढा, मनोरंजन, सोलापूर
‘सूर्योदय’ने समाजातील प्रत्येक घटकांसोबत अतूट नाते जोडले; सेवानिवृत्त शिक्षक, सैनिक यांचा सहकुटुंब गौरव; सूर्योदय समूहाचे सर्व उपक्रमांचे नागरिकांकडून मनापासून कौतुक

टीम मंगळवेढा टाईम्स। 

देशाच्या सीमेचे रक्षण करताना आपल्या प्राणाची बाजी लावून पराक्रमाची शर्थ करणारे सैनिक आणि तीस-पस्तीस वर्षे ज्ञानामृताने कित्येक पिढ्या घडवणारे गुरुजन त्याचबरोबर महसूल, कृषी, बांधकाम अशा विविध क्षेत्रांमधून अनेक वर्षे सेवा करून कृतार्थ भावनेने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी वृंदांचा

गौरव करत असताना वेळोवेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणीजनांचा सन्मान करण्याची सूर्योदय परिवाराची गेल्या अनेक वर्षांची परंपरा असल्याचे मत सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी व्यक्त केले.

वित्तीय संस्था आणि उद्योग याबरोबरच अनेक क्षेत्रांमधून उत्तमरीत्या कार्यरत असलेल्या सूर्योदय उद्योग समूह संचलित “सूर्योदय फाउंडेशन” च्या वतीने सांगोला तालुक्यातील सन 2024-25 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी वृंदांचा “सन्मान कर्तृत्वाचा” हा गौरव सोहळा सांगोला येथील महात्मा फुले चौकातील “सूर्योदय अर्बन”  संस्थेच्या प्रशस्त सभागृहामध्ये संपन्न झाला.

याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर पेन्शनर संघटनेचे तालुकाध्यक्ष वसंत दिघे साहेब, जय जवान माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष सुभेदार रविकांत मराळ, साहित्यिक तसेच चैतन्य हास्य क्लबचे प्रा राजेंद्र ठोंबरे यांच्यासह सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक आणि सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ बंडोपंत लवटे, एल के पी मल्टीस्टेट चे व्हॉ.चेअरमन सुभाष दिघे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सूर्योदयने समाजातील प्रत्येक घटकांसोबत अतूट नाते जोडलेले असून सन्मान सोहळ्यासाठी सर्व सत्कारमूर्ती सहकुटुंब आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे आपला आशीर्वाद आणि स्नेहभाव या निमित्ताने कायम राहील अशी अपेक्षाही यावेळी इंगवले यांनी व्यक्त केली.

मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मोठी गर्दी असताना देखील सुमारे तीन तास अत्यंत शांततेत व शिस्तीत कार्यक्रम संपन्न झाल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी माजी प्राचार्य सुनील नष्टे, माजी प्राचार्य मनोज उकळे, कॅ. हनुमंत माने, कॅ. धनाजी पवार, बंडोपंत येडगे, मिलिंद बोरकर, सुनिता खंकाळ मॅडम इत्यादी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना विविध प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय करत आणि अत्यंत सक्षमपणे आर्थिक संस्था सांभाळत असताना मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सूर्योदय समूहाचे आणि त्यांच्या सर्व उपक्रमांचे मनापासून कौतुक केले.

सूर्योदय ग्रुपचे सहसंस्थापक आणि सूर्योदय अर्बनचे चेअरमन जगन्नाथ भगत यांनी आपल्या ओघवत्या शैलीत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एल के पी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन, सूर्योदय महिला अर्बन, सूर्योदय दूध विभाग त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठे खरेदी दालन असलेले सूर्योदय मॉल व वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉल इत्यादी प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय करत शेकडो तरुणांच्या हाताला काम देत असताना सामाजिक बांधिलकीचे भान देखील कायम राखत वृक्षारोपण, जलसंधारण, गुनीजनांना पुरस्कार व सन्मान, तीर्थयात्रा दर्शन, विविध प्रकारची आरोग्य शिबिरे, व्यापक स्वरूपातील रक्तदान शिबिरे अशा कितीतरी माध्यमातून सूर्योदय उद्योग समूह यशस्वीपणे वाटचाल करत आहे.

सन्मान कर्तुत्वाचा या आजच्या कार्यक्रमांमध्ये सांगोला तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, माध्यमिक तसेच ज्यूनियर, सीनियर कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर, त्याचबरोबर सैन्य दलातील विविध पदांवरचे सेवानिवृत्त अधिकारी, ग्रामसेवक तसेच कृषी ,महसूल, बांधकाम अशा विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचारी वृंदांचा यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते “सन्मानचिन्ह” देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला.

शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. आमच्या ध्यानीमनी नसतानाही आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रभर नावलौकिक असलेल्या “सूर्योदय” सारख्या संस्थेने आमचा सेवानिवृत्ती निमित्त केलेला गौरव कायमस्वरूपी आमच्या स्मरणात राहील अशा भावना यावेळी अनेकांनी बोलून दाखवल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्योदय अर्बन, महिला अर्बन आणि एल.के.पी मल्टीस्टेटच्या कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सूर्योदय परिवार

संबंधित बातम्या

दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
सांगोल्यात जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संतांच्या भूमीत जुगाराचा विळखा; तरुणाई कर्जबाजारी, प्रशासन मात्र सुस्त; जुगार क्लबमुळे तरुणांचे भविष्य पणाला, यंत्रणेचे मात्र दुर्लक्ष?

March 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार सुट्ट्या

March 17, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

ब्रेकिंग! सोलापूर झेडपी अध्यक्षपदाचा पेच सुटणार? पालकमंत्र्यांकडे सर्वांच्या नजरा; ‘ही’ नावे आहेत सर्वात पुढे

March 16, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

काळीज पाषाणाचं! जन्म देताच माता-पित्यांचे पलायन; सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 16, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

प्रेमाचा ‘बुरखा’ फाटला! खरी ओळख लपवून तरुणीला प्रेमजाळ्यात ओढले, जात-धर्म लपवून तरुणीची फसवणूक; संशयास्पद तरुणाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

मंगळवेढ्यात ‘सोन्या’चा नवा खेळ! बँकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय?; बँकांचे धाबे दणाणले; बँका, पतसंस्थांनी सावध राहणे गरजेचे

March 15, 2026
Next Post
मंगळवेढा हादरला! एका विवाहित महिलेवर तीघांचा जबरी अत्याचार; इज्जतेपोटी ‘त्या’ विवाहितेने केली आत्महत्या; आरोपींना ठोकल्या बेड्या

संतापजनक! बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हात-पाय दाबायला सांगत धरले हाताला अन्…; अत्याचारित मुलीला मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने मिळवून दिला न्याय

ताज्या बातम्या

दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
सांगोल्यात जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संतांच्या भूमीत जुगाराचा विळखा; तरुणाई कर्जबाजारी, प्रशासन मात्र सुस्त; जुगार क्लबमुळे तरुणांचे भविष्य पणाला, यंत्रणेचे मात्र दुर्लक्ष?

March 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार सुट्ट्या

March 17, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

ब्रेकिंग! सोलापूर झेडपी अध्यक्षपदाचा पेच सुटणार? पालकमंत्र्यांकडे सर्वांच्या नजरा; ‘ही’ नावे आहेत सर्वात पुढे

March 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..