टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील सुरसंगम ग्रुपचा सहावा वर्धापनदिन सोहळा आज शनिवार दि.१४ मे रोजी श्री.गणेश बाल उद्यान येथे मोठ्या उत्साहात साजरा होत असून यावेळी पुरस्कार वितरण व सुरसंगम परिवारातील गुणवंत व पुरस्कार प्राप्त सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
आज वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त सायं.६ वाजता मंगळवेढयाची सुकन्या व मुंबई येथील संगीत विशारद महाराष्ट्राचे हास्य जत्रा फेम अनुष्का विजय शिकतोडे यांना यावर्षीचा संगीतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे हे भुषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास अ.भा. मराठी नाटय परिषद मुंबई शाखा मंगळवेढाचे अध्यक्ष डॉ.सुभाष कदम म.सा.प.दामाजीनगर शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे उपस्थित राहणार आहेत.
यांचा होणार सन्मान
यावेळी विशेष यश मिळविल्याबद्दल तसेच पुरस्कार मिळाल्याबद्दल लहू ढगे, शंकर आवताडे, प्रा.कल्पेश कांबळे, रफिक शेख, संतोष ढावरे, अशपाक काझी, डॉ.शाकीर सय्यद, रविंद्र लोकरे, दत्तात्रय वाघ, गोरक्ष जाधव, अशोक उन्हाळे,
शुभदा जोशी, संगीता इंगोले, डॉ.शबनम सय्यद, लक्ष्मी माने , रेखा कांबळे , संगीता वासनिक, स्वामी आदिंचा प्रप्फुल्लता स्वामी आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे.
मराठी व हिंदी गाण्याच्या ट्रॅक शो
सायं. ६.३० सुरसंगम प्रस्तुत मराठी व हिंदी गाण्याच्या ट्रॅक शोमध्ये सुरसंगम परिवारातील सदस्य व निमंत्रित कलावंत आपली गाणी सादर करणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज