टीम मंगळवेढा टाईम्स।
गेल्या चार दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या गडगडाटात अवकाळी पाऊस पडत आहे. याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे.
आज सायंकाळी 6 वाजता मंगळवेढा तालुक्यात व शहरात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तर 5000 कडब्याच्या बनीमवरती वीज पडून बनीम जळून खाक झाली आहे. मंगळवेढा शिवारातील आवताडे वस्ती येथे अवकाळी पावसात अचानक कडबा बनीमवरती वीज पडून बनीम जळून खाक.
गळवेढा शिवारात आवताडे वस्ती येथे नामदेव वसंत आवताडे यांची 5000 पेंड्यांची कडब्याची बनीम आकाशातून वीज पडून जागेवर जळून खाक झाली.
निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याची प्रचंड आर्थिक हानी झाली आहे. शासनाकडून तात्काळ पंचनामा होऊन सदर शेतकऱ्यास तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे पिकांना मोठा फटका बसत आहे. पिके जमीनदोस्त होत आहेत.
आज झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
वादळी वाऱ्याने पाठखळ मंगळवेढा रोडवर झाड पडले असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज