टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी शहर व तालुका यांनी आज खा. शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे प्रतिनिधी अभिजीत पाटील यांचे नेतृत्व स्वीकारून
आज मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध पश्नावर मंगळवेढा उपविभागीय अधिकारी, नगरपरिषद मंगळवेढा, बांधकाम विभाग मंगळवेढा यांचेकडे आगामी होणाऱ्या नवरात्र महोत्सवाचे करीता मिरवणूक मार्गावर स्वच्छता करणे,
रस्त्यावर असलेले खड्डे मुजवणे, सांगोला रोड ते एकेरी देवी मार्गावर लाईट दुरूस्त करणे, रोडलगत ची झुडपे तोडणे जेणेकरून भाविक भक्ताना पायी चालताना कोणताही त्रास होणार नाही.
तसेच सध्या सर्वसामान्य दूध उत्पादक यांचा भिजत आसलेला दूध दर कमी होत असलेचा प्रमुख प्रश्न व यावर ढोस उपाय व्हावा अशा विविध मागण्याचे निवेदन देऊन योग्य पुर्तता करणेकरीता सर्वराष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केली.
यावेळी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा कार्याध्यक्ष मुजम्मील काझी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभेरी, तालुका उपाध्यक्ष संतोष रंदवे,
श्री विठ्ठल सहकारी साखर माजी संचालक रायाप्पा हळणवर, शहर उपाध्यक्ष वैभव ठेंगील, सचिन वडतिले, नितीन सरडे, जमीर इनामदार, शंकर साळुंखे आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज