टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला लाखो मराठा बांधव राज्यभरातून जालन्यात दाखल झाले होते. या सभेआधी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी करत जोरदार टीका केली होती.
गुणरत्न सदावर्ते यांनी दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत वापरलेल्या शब्दांवर मराठा समाजाने आक्षेप घेतला आहे. आम्ही आमच्या स्व खर्चाने आमच्या न्याय हक्कांसाठी लढत असताना मनोज जरांगे यांची जत्रा, लॉयल डॉग, विना पेंद्याचा लोटा, लावले रताळ उगली केळ, अशा शब्दांचा प्रयोग करून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी अशी भाषा वापरुन मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, शिवाय दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मंगळवेढा सकल मराठा समाजाने केली आहे
तसेच अनेक वाचाळवीर मराठा आरक्षणाच्या विरोधात बेताल वक्तव्य करत आहेत त्यांनी ते नाही थांबवले तर त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज