मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मंगळवेढा तालुक्यातील लेडवे चिंचाळे व मौजे डोंगरगाव या गावाच्या परिसरात बिबट्या वन्यप्राण्यांच्या वावर असल्याची खोटी माहिती सोशल मिडीया वर प्रसारित केल्याबाबत सोशल मिडीया वर खोट्या, अप्रमाणित व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचे निदर्शनास आले असून अशा अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा.

खोट्या बातम्या प्रसारित करून नागरिकांमध्ये भिती व संभ्रम निर्माण करणे हा गंभीर गुन्हा आहे. बिबट्या संदर्भात खोट्या बातम्या, बनावट फोटे, बनावट व्हिडीओ किंवा अफवा पसरविण्याऱ्या सबंधित व्यक्तींवर शासकीय नियमानुसार कायदेशिर कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी, असा इशारा लेखी पत्रकाद्वारे पंढरपूर विभागाच्या वनपरिक्षेत्र आधिकारी शितल चाटे यांनी दिले आहेत.

बाबाबत सविस्तर माहिती अशी, मंगळवेढा तालुक्यातील मौजे लेंडवे चिंचाळे परिसरात दि.२१ डिसेंबर रोजी बिबट्या सदृष्ण वन्यप्राणी आढळून आल्याचा मागील दोन दिवसांपासून सोशल मिडीया वर व्हिडीओ प्रसारित होत असून.

त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे बाताबरण निर्माण झाले आहे तसेच नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त बनपाल मंगळवेढा व वनरक्षक होत आहेत. त्या अनुषंगाने वनविभागाचे अधिकारी कर्मचारी हुलजंती यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता बिबट्या वन्यप्राण्याचे उसे (पाऊल खुणा) आढळून आले नाहीत किंवा बिबट्या वन्यप्राण्याचा वावर असल्याचा पुरावा किंवा इतर कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नाहीत.

तसेच दि. २४ डिसेंबर रोजी मौजे डोगरगाव येथे रेडकू मारल्याची माहिती सोशल मिडीया वर प्रसारित झाली आहे. सदर ठिकाणीही वनविभागाचे अधिकारी/कर्मचारी वनपाल मंगळवेढ व वनरक्षक हुलजंती यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता बिबट्या वन्यप्राण्याचे ठसे (पाऊल खुणा) आढळून आले नाहीत किंवा बिबट्या वन्य्याण्याचा बावर असल्याचा पुरावा किंवा इतर कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नाहीत.
परिणामी मंगळवेढा तालुक्यात कोणत्याही परिसरात बिबट्या वन्यप्राण्याचा वावर आढळून आला नाही. त्यामुळे वनविभागाकडून नागरिकांना निवेदन करण्यात आले असून मंगळवेढा तालुक्यात बिबट्याचा वावर असल्यासंदर्भात

सोशल मिडीया वर खोट्या, अप्रमाणित व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे अशा अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा. खोट्या बातम्या प्रसारित करून नागरिकांमध्ये भिती व संभ्रम निर्माण करणे हा गंभीर गुन्हा आहे.
वनविभागाशी संपर्क करण्याचे नागरिकांना केले आवाहन
बिबट्या संदर्भात खोट्या बातम्या, बनावट फोटे, बनावट व्हिडीओ किंवा अफवा पसरविण्याऱ्या सबंधित व्यक्तींवर शासकीय नियमानुसार कायदेशिर कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी, तसेच वन्यप्राणी बिबट, तरस, लांडगा, कोल्हा, वइतर क्न्यप्राणी एखाद्या गावात किंवा वस्तीवर जर आले तर त्यास कोणत्या प्रकारचा त्रास नदेता ताबडतोब वनविभाग पंढरपूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














