टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरातील विजयपूर रोड आणि आसरा परिसरातील 63 भाजी विक्रेत्यांची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट महापालिकेने केली. त्यामध्ये तब्बल 11 भाजी विक्रेत्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला. ही बाब चिंता वाढविणारी असल्याने आता महापालिका आयुक्तांनी भाजी विक्रेत्यांसह विडी कामगार, वस्त्रोद्योगातील व कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कामगार, व्यापारी, गाळेधारकांना टेस्ट करुन घेणे बंधनकारक करण्याचा आदेश काढला.
शहरातील साडेदहा लाख लोकसंख्येपैकी सुमारे दोन लाख को-मॉर्बिड व्यक्तींना आजपासून कार्डचे वाटप केले जाणार आहे. या नागरिकांवर आगामी दोन महिन्यांपर्यंत वॉच ठेवला जाणार असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, असेही महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
दुसरीकडे गाळेधारक, व्यापारी, विडी व वस्त्रोद्योगातील कामगार, बाजार समितीतील व्यापारी, कामगारांना टेस्ट करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आदेशानंतरही टेस्ट करुन न घेणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी आदेशातून स्पष्ट केले आहे. नागरिकांना भाजीपाला विक्री करणाऱ्या सर्वांनी ऍन्टीजेन टेस्ट करुन घ्यावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये हा आदेशामागील उद्देश आहे.
In Solapur, vegetable sellers are positive, test is mandatory for vegetable sellers including squatters.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज