टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 503 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत 628 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या 22 हजार 670 वर गेली आहे.
आज एकूण 2 हजार 668 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 2 हजार 165 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 503 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या आता 22 हजार 670 एवढी झाली आहे तर मृत्यूंची संख्या 628 एवढी झाली आहे.
कोरोनामुळे बाधित झाल्याने 7 हजार 112 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर कोरोनातून मुक्त झाल्यामुळे 14 हजार 930 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
आज ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू
मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील 60 वर्षाची महिला,पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील 76 वर्षाचे पुरुष, वाघोली (ता. मोहोळ) येथील 67 वर्षाचे पुरुष, दोड्डी (ता. दक्षिण सोलापूर) येथील 86 वर्षाची महिला, अकलूज (ता. माळशिरस) येथील 63 वर्षाचे पुरुष,
तर माळशिरस तालुक्यातील निमगाव येथील 73 वर्षाचे पुरुष, टेंभुर्णी (ता. माढा) येथील 74 वर्षाची महिला, भांबेवाडी (ता. मोहोळ) येथील 60 वर्षाची महिला, सोलापूर रोड बार्शी येथील 78 वर्षाचे पुरुष तर उपळे दुमाला (ता. बार्शी) येथील 75 वर्षांच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या व कंसात मृत्यू
मंगळवेढा-1 हजार 40 (22),सांगोला- 1 हजार 589 (20),पंढरपूर- 4 हजार 459 (109),मोहोळ- 957 (44),दक्षिण सोलापूर- 1 हजार 220 (30),अक्कलकोट- 856 (57), बार्शी- 4 हजार 202 (142), करमाळा- 1 हजार 757 (34), माढा- 2 हजार 286 (70), माळशिरस- 3 हजार 646 (71), उत्तर सोलापूर- 658 (29), एकूण- 22 हजार 670 (628)
503 new corona positive 10 victims in rural Solapur today
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज