mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अनियमित कर्जवाटप प्रकरण, 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; 33 जणांच्या अडचणी वाढल्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 9, 2024
in सोलापूर
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळाला मोठा धक्का बसलाय. सोलापूर डीसीसी बँकेचे 238 कोटी 43 लाख रुपयांचे अनियमित कर्ज वाटल्याने झालेल्या नुकसानीस तत्कालीन संचालक मंडळास जबाबदार धरण्यात आलंय.

ही रक्कम व्याजासह वसुल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय शिंदे यांच्यासह 33 जणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सोलापूरच्या डीसीसी बँकेच्या संचालक मंडळाने चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या आणि सहकाऱ्यांच्या कारखान्याना कर्ज वाटल्याची तक्रार बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी 2010 साली दिली होती. या प्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम 88 अन्वये झालेल्या चौकशीत बँकेच्या आर्थिक नुकसानीस तत्कालीन संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले आहे.

238 कोटी 43 लाख रुपये आणि कर्ज उचलल्यापासून 12 टक्के व्याजासह रक्कम निश्चित करण्यात आली आहे. चौकशी अधिकारी किशोर तोष्णीवाल यांनी ही रक्कम व्याजासह वसूल करावी, असे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाचे मुख्य तक्रारदार असलेले बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी निकालानंतर समाधान व्यक्त केलं. 14 वर्ष सुरु असलेल्या लढ्याला यश असल्याची भावना आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली.

आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, “सोलापूर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटपामध्ये अनियमितता झाल्याची तक्रार मी केली होती. तत्कालीन बँकेच्या संचालकांनी स्वतःच्या कारखान्यांना तसेच सहकाऱ्यांच्या कारखान्यांना अनियमित पद्धतीने खास बाब म्हणून कर्जवाटप केले होते.

त्याविरोधात मी 2010 साली मी रिझर्व बॅक, नाबार्ड आणि सहकार खात्याकडे याबाबत पहिली तक्रार दिली होती. त्याची दखल घेतली जात नसल्याने 2013 साली मी हायकोर्टामध्ये या विरोधात दाद मागितली होती.”

आमदार राजेंद्र राऊत पुढे म्हणाले की, “सहकार कायद्यातील कलम 88 नुसार सहकार न्याय प्राधिकरणाने चौकशी करून निकाल दिला आहे. माझ्या तक्रारीनंतर अनियमित पद्धतीने खास बाब म्हणून वाटलेल्या कर्जाच्या मूळ मुद्दल असलेल्या 238 कोटी रुपयांच्या वसुलीला तत्कालीन संचालक मंडळ पात्र असल्याचा निकाल सहकार न्यायप्राधिकरणाने दिला आहे.

कर्जखाते बुडीत असल्यापासून ते आतापर्यंत व्याजासह वसुली करायची झाल्यास 1 हजार कोटी रुपयांपर्यंत वसुली करावी लागणार आहे. मागील 14 वर्षांपासून सुरू असलेल्या लढाईचा वनवास संपून आज शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.”

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यातील ‘या’ कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ खत दुकानांवर निलंबनाची कारवाई; भरारी पथकाच्या तपासणीत आढळले गंभीर दोष

June 12, 2025
कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

June 11, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सरचिटणीसाची सोलापुरात आत्महत्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले पुढे…

June 9, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

लग्नामध्ये जेवणाच्या पंगतीत शिवीगाळ; दोन गटात तुंबळ हाणामारी, भांडण सोडवण्यासाठी आलेल्यांनाही मारहाण; तिघे गंभीर जखमी

June 10, 2025
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

अपेक्षांचे टेक ऑफ..! सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक क्षण; आजपासून गोव्यासाठी विमानसेवा सुरू; मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची हजेरी

June 9, 2025
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धक्कादायक! सामायिक बांधाच्या वादातून शेतकऱ्याचा खून; दोघा भावांवर खुनाचा गुन्हा दाखल

June 8, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

June 8, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

प्रेमाचा भयंकर शेवट! ज्योतिबाच्या डोंगर परिसरात बायकोची गळा चिरून हत्या; पती कोल्हापुरातून थेट सोलापूर पोलीस ठाण्यात; नेमकं घडलं काय?

June 8, 2025
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! पीएम किसानची फाइल डाऊनलोड केली; सोलापूर जिल्ह्यातील तहसीलदाराचा मोबाइल हॅक; ‘ही’ बाब झाल्याने घटना उघडकीस

June 7, 2025
Next Post
नागरिकांनो! विकास कामांच्या जोरावरच मला आणखी एक संधी द्या, मतदारसंघाच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत मी कटिबद्ध; आमदार समाधान आवताडेंचे जनतेला आवाहन

नागरिकांनो! विकास कामांच्या जोरावरच मला आणखी एक संधी द्या, मतदारसंघाच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत मी कटिबद्ध; आमदार समाधान आवताडेंचे जनतेला आवाहन

ताज्या बातम्या

मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

June 12, 2025
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यातील ‘या’ कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ खत दुकानांवर निलंबनाची कारवाई; भरारी पथकाच्या तपासणीत आढळले गंभीर दोष

June 12, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणावर स्टे आहे की नाही? कोर्टाने काय म्हटलं?; सुनावणीवेळी काय काय घडलं? जाणून घ्या…

June 12, 2025
मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

June 12, 2025

आदेश धडकला! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत मोठी बातमी; प्रभाग रचना करण्याचा सरकारचा आदेश

June 11, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

खळबळ! आयुष्य उद्ध्वस्त करेन, जीव घेण्याची धमकी, पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप; पत्र लिहून हवालदार गायब; पती हरवल्याची पत्नीची तक्रार

June 11, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा