टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज पुन्हा 411जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्याचबरोबर नऊ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.तर आज 608 जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडले आहे.
आज 2 हजार 742 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 2 हजार 331 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 411 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या 25 हजाराच्या पुढे गेली असून आज आलेल्या अहवालानंतर हा आकडा 25 हजार 435 एवढा झाला आहे तर आतापर्यंत 688 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अद्यापही रुग्णालयात 6 हजार 70 जण उपचार घेत आहेत.18 हजार 677 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
आज ‘या’ गावातील नऊ पुरुषांचा कोरोनाने मृत्यू
मोहोळ शहरातील न्यू समर्थ नगर येथील 69 वर्षाचे, देवकते वस्ती कुर्डूवाडी (ता. माढा) येथील 60 वर्षाचे, नाझरे (ता. सांगोला) येथील 55, जवळा (ता. सांगोला) येथील 88 वर्षाचे, वैराग (ता. बार्शी) येथील 60 वर्षाचे,
तर अकलूज आनंदनगर येथील 72 वर्षाचे, नाझरे (ता. सांगोला) येथील 43 वर्षाचे, अकलूज (ता. माळशिरस) येथील 55 वर्षाचे, तर भोसे (ता. पंढरपूर) येथील 56 वर्षांच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरात 54 पॉझिटिव्ह तर दोघांचा बळी
सोलापूर महापालिका हद्दीत आज 54 अहवाल पॉझिटिव्ह आले असून कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आजच्या एकाच दिवशी 33 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
सोलापूर महापालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 8 हजार 519 झाली आहे. आज नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये मुरारजी पेठ येथील अभिमान श्री कॉम्प्लेक्स, हैदराबाद रोड वरील विडी घरकुल, आसरा चौक, विजापूर रोड वरील राणाप्रताप सोसायटी येथील राघवेंद्र नगर,
तर विजापूर रोडवरील विद्या नगर, जुळे सोलापूर आसरा चौक, रेल्वे लाइन्स, अक्कलकोट रोडवरील झोपडपट्टी नंबर 3, अशियाना नगर इंदिरा नगर, वसंत विहार, अरविंद धाम पोलीस वसाहत, अभिमानश्री नगर, उत्तर कसबा, जुळे सोलापुरातील दत्तनगर, मजरेवाडी, काळी मशिदीजवळ, जोडभावी पेठ, मजरेवाडी, गोविंदश्री मंगल कार्यालय जवळ,
तर विजापूर रोडवरील अंबिकानगर, पश्चिम मंगळवार पेठ, न्यू पाच्छा पेठ, सिव्हिल हॉस्पिटल जवळ, सैफूल परिसरातील सवेरा नगर, कुमठा नाका अंत्रोळीकर नगर येथील यशवंत सोसायटी, सैफूल येथील राणाप्रताप हाउसिंग सोसायटी, नई जिंदगी येथील शिवगंगा नगर, मल्हार अपार्टमेंट, कुमठे गाव, आराधना आपार्टमेंट बंजारा सोसायटी, आसरा येथील गजानन अपार्टमेंट, मोहिते नगर, मजरेवाडी,
तर श्रमजिवी नगर येथील नीलम नगर, पत्रकार भवन जवळ, जुळे सोलापूर, जुळे सोलापूर कोणार्क नगर, इंद्रधनू अपार्टमेंट, भद्रावती पेठ, मंगळवार पेठ, क्षेत्रीय गल्ली, राजेंद्र चौक, गांधीनगर लष्कर, हैदराबाद रोडवरील मंत्री चंडक नगर या भागात नव्याने रुग्ण आढळले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज