टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात आज पुन्हा नव्या 54 रुग्णांची भर पडली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आज रविवारी शहरातील 130 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 1 हजार 548 रुग्ण शहरातील विविध रुग्णलयांमध्ये उपचार घेत आहेत.तर विजयपूर रोडवरील कमला नगरातील 72 वर्षीय महिलेचा कोरोनाने घेतला बळी आहे. ( Solapur city Corona news update )
आज मुकुंद नगर (भवानी पेठ), हब्बू वस्ती (देगाव नाका), गांधी नगर, शिक्षक सोसायटी (सदर बझार), चंडक बागेजवळ, मंत्री चंडक, मेहता नगर (शेळगी), रविवार पेठ, लक्ष्मी नगर, गणेश नगर (बाळे), अशोक चौक, हुच्चेश्वर नगर, सोरेगाव, राहूल नगर, संगीता अर्पाटमेंट (होटगी रोड), सुंदरम नगर, लक्ष्मी चाळ, न्यू पाच्छा पेठ, कोंडा नगर, आंबेडकर नगर, मसरे गल्ली, आंबराई, उत्कर्ष नगर ,
स्वामी विवेकानंद, मल्लिकार्जुन नगर (हत्तुरे वस्ती), साई नगर (होटगी रोड), नेहरु नगर, जानकी नगर (जुळे सोलापूर), मामलेदार प्लॉट (कुमठे), विडी घरकूल, राघवेंद्र नगर, तक्षशिला नगर (कुमठा नाका), श्रध्दा एम्पायर (रामलाल चौक), सिध्दार्थ सोसायटी या ठिकाणी आज नव्या रुग्णांची भर पडली आहे.
सोलापूर शहरात आत्तापर्यंत 35 हजार 687 व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.
आतापर्यंत शहरात सापडले 5 हजार 104 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.आणि आत्तापर्यंत शहरातील 365 रुग्णांचा झाला कोरोनाने मृत्यू आहे तर 3 हजार 191 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे,।
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज