mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनाची 15 व 16 ऑगस्टला भरगच्च मेजवानी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनाची 15 व 16 ऑगस्टला भरगच्च मेजवानी




समाधान फुगारे । 
सुरसंगम म्युझिकल ग्रुप, म.सा.प.दामाजीनगर आणि अ.भा.मराठी नाटय परिषद शाखा मंगळवेढा यांच्या वतीने शनिवार दि.15 ऑगस्ट व रविवार दि.16 ऑगस्ट रोजी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हे दोन दिवसीय संमेलन ऑनलाईन पद्धतीने साहित्य व संगीतप्रेमींना पाहता येणार आहेत.



शनिवार दि.15 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार असून सकाळी ग्रंथपुजनानंतर 10 वाजता संमेलनाचे उदघाटन संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांचे हस्ते, संयुक्त संमेलनाचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे अध्यक्षतेखाली तसेच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.स्वाती शिंदे व स्वागताध्यक्ष अ‍ॅड.नंदकुमार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता कथाकथन कार्यक्रमाचे उदघाटन पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांचे हस्ते, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली, फॅबटेक शुगरचे चेअरमन सरोज काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

दुपारी 2 वाजता नवोन्मेेष या कवीसंमेलनाचे उदघाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांच्या हस्ते,दामाजी शुगरचे माजी चेअरमन प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली तर पांडुरंग पतसंस्थेचे चेअरमन किसन सावंजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. सायं.4 वाजता प्रकाश जडे लिखित वात्सल्यसुक्त या कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्षा अरूणा माळी यांचे हस्ते, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांचे अध्यक्षतेखाली, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य शशिकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.



सायं.5.30 वाजता एकपात्री अभिनय सादरीकरणाचे उदघाटन नगरसेविका अनिता नागणे यांच्या हस्ते, माजी नगरसेविका अनुराधा ढोबळे यांचे अध्यक्षतेखाली, संत दामाजीनगरचे सरपंच अ‍ॅड.दत्तात्रय तोडकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून सायं.7 वाजता काव्यरंग या कार्यक्रमाचे उदघाटन यशोदा महिला पतसंस्थेच्या चेअरमन निला अटकळे यांच्या हस्ते, जि.प.सदस्या शैला गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष अशोक माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

रविवार दि.16 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय संगीत संमेलनाचे उदघाटन आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते, संगीत संमेलनाचे अध्यक्ष मोहम्मद आयाज यांच्या अध्यक्षतेखाली व स्वागताध्यक्ष अ‍ॅड.सुजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असून सकाळी 11 वाजता शास्त्रीय गायन/वादन/नृत्य या कार्यक्रमाचे उदघाटन माजी जि.प.सदस्या अ‍ॅड.रोहिणी पवार यांचे हस्ते, इंग्लिश स्कुल ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या तेजस्विनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसेविका राजश्री टाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

दुपारी 1 वाजता उपशास्त्रीय गायन /वादन/लोकरंग या कार्यक्रमाचे उदघाटन जकराया शुगर्सचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांचे हस्ते, श्री दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगरसेवक रामकृष्ण नागणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून दुपारी 2.30 वाजता मराठी व हिंदी गाण्यांच्या ट्रॅक शो चे उदघाटन न.पा.पक्षनेते अजित जगताप यांचे हस्ते, नगरसेवक प्रविण खवतोडे यांच्या अध्यक्षतेखाली व नगरसेवक राहुल सावंजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

सायं.5.30 वाजता संयुक्त संमेलनाचा समारोप अध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड.नंदकुमार पवार व संगीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड.सुजित कदम तसेच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

सदरचे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रकाश जडे, डॉ.सुभाष कदम, दिगंबर भगरे, डॉ.शरद शिर्के, लहू ढगे,अ‍ॅड.रमेश जोशी, यतिराज वाकळे,  लक्ष्मण नागणे, संभाजी सलगर, राकेश गायकवाड, प्रा.कल्पेश कांबळे, प्रा.दत्ता सरगर, दिगंबर यादव,गोरक्ष जाधव, अजय देशपांडे, वासुदेव जोशी, मयुर हजारे, अवंती पटर्धन, दया वाकडे, प्रप्फुल्लता स्वामी, रेश्मा गुंगे, भारती धनवे आदि प्रयत्नशील आहेत.

Mangalwedha Celebration of State Level Literature-Music Conference on 15th and 16th August

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSanskrutikSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
Amit Shah Corona : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

Amit Shah Corona : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा