टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री.सदगुरु सीताराम महाराज साखर कारखाना खर्डी या साखर कारखानाचा ११ वा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ आज गुरुवार दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा पदमश्री क्रांतीवीर डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना वाळवाचे चेअरमन वैभव नायकवडी व दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांच्या हस्ते
व कृषिभूषण विश्वासराव करे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती कारखान्याच्या चेअरमन प्रा.शोभाताई काळुंगे यांनी दिली आहे.
या ऊस गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, स्वेरीचे प्राचार्य बी.पी. रोंगे, जकराया शुगरचे चेअरमन बी.बी जाधव, शिवाजीराव भोसले, श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे,
सीताराम महाराज साखर कारखान्याचे माजी चेअरमन गणेश ठिगळे, डॉ.बी.एस.माने, जनकल्याण मल्टीस्टेटचे चेअरमन राजेंद्र हजारे, धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे, ऍड . दीपाली पाटील, स्नेहल मुदगल
तसेच डॉ. सूर्यकांत रोंगे, श्रीधर कारंडे, बबन शिंदे, युवराज गडदे, नागनाथ पवार, लक्ष्मण वाघमोडे, विलास पाटील, तुकाराम मोहिते, सतीश सुर्वे, नवनाथ पवार, प्रतापसिंह खंडागळे, संजय जाधव व ऊस उत्पादक शेतकरी आदी मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडणार आहे.
श्री सदगुरु सीताराम महाराज साखर कारखान्याने गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली. सदर कार्यक्रमास सर्व ऊस उत्पादक शेतकरी व हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कारखानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी गायकवाड-काळुंगे व जनरल मॅनेजर हणमंत पाटील यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज