टीम मंगळवेढा टाईम्स ।
दि.महाराष्ट्र स्टेट को ऑफ मार्केटिंग फेडरेशन मुंबई, सोलापूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत
मूग, उडीद, सोयाबीन, हमीभाव खरेदी केंद्राच्या ऑनलाईन नावनोंदणीस मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी- विक्री संघाच्या कार्यालयांमध्ये आज गुरुवार दि.१४ आँक्टोंबर पासुन प्रारंभ होत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर बबनराव अवताडे यांनी केले आहे.
या योजनेमध्ये मुग पिकासाठी ७ हजार २७५ , उडीद ६ हजार ३०० तर सोयाबीन ३ हजार ९५० रुपये हमीभाव दर शासनाने निश्चित केला आहे.
शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करिता मूग, उडीद, सोयाबीन या पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, झेरॉक्स ही कागदपत्रे आणावीत हमीभाव खरेदी केंद्राच्या अधिक माहितीसाठी शंभू मामा नागणे 9405214595 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन सिद्धेश्वर आवताडे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज