टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील श्री संत दामाजी चौकातील श्री.समर्थ मोबाईल शॉपी हे मोबाइल दुकान फोडून चोरट्याने २५ हजार १०० रुपयांचे मोबाइल व साहित्य चोरून नेले.
नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली. विनायक श्रीधर अलिगावे , वय ३५ , रा . शनिवार पेठ यांनी दिली. त्यावरून बुधवारी येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
अलिगावे यांनी ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता दुकान बंद केले . त्यानंतर ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी चोरी झाल्याचे उघड झाले.
पोलिस उपनिरीक्षक सौरभ शेटे तपास करीत आहेत. दरम्यान, गेल्या पाच महिन्यात शहरात अनेक चोऱ्या झाल्या आहेत. त्याच्या तपासात चार अल्पवयीन मुले आढळली आहेत. त्यापैकी तीन जणांची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संत बाळूमामा जन्मोत्सवानिमित्त रविवारी बेलाटीत धार्मिक कार्यक्रम
श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या जन्मोत्सवानिमित्त बेलाटी ( ता . उत्तर सोलापूर ) येथील मंदिरात रविवारी ( दि . १७ ) विविध धार्मिक कार्यक्रम आयोजल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री . पाटील म्हणाले , ‘ रविवारी दुपारी सव्वाचार वाजता गुलाल कार्यक्रम होईल . त्यानंतर दत्ता सरवदे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल . ओवीकार बापू बंडगर , मारुती काळे ( कवठेकर ) , आड्याप्पा पुजारी ( हुलजंती ) यांचा ओवींचा कार्यक्रम होईल. त्यानंतर एकनाथ महाराजांच्या भारूडाचा कार्यक्रम होणार आहे.
तावशीकर महाराजांच्या गझी ढोलचा कार्यक्रम आयोजिला आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून सर्व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.(स्रोत:दिव्य मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज