टीम मंगळवेढा टाईम्स ।
भिशीतील पैशाच्या देवाण-घेवाणीवरून एका वृद्धाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ९:३० च्या सुमारास भर दिवसा मालेगाव (आर, ता. बार्शी) येथे हा प्रकार घडला असून,
या प्रकरणी वैराग पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह अन्य दोघांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदला आहे.
सुरेश घोडके (वय ६०) असे मयत वृद्धाचे आव असून, पोलिसांनी संशयित आरोपी समाधान घोडके, जनाबाई भारत घोडके यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
दादासाहेब सरेश घोडके (रा.मालेगाव, ता. बार्शी) हा वडील सुरेश घोडके यांच्यासोबत बुधवारी सकाळी शेतामध्ये जाऊन परत आला होता. त्यानंतर ९:३० च्या सुमारास गावातील लोकांनी दादासाहेब यास सांगितले की, समाधान घोडके व इतर दोघेजण तुझ्या वडिलांना मारहाण करीत आहेत.
त्यामुळे दादासाहेब वडील सुरेश घोडके यांना मारहाण होत असलेल्या ठिकाणी पोहोचला. त्यावेळी संशयित आरोपी समाधान घोडके व इतर दोघे काठीने मारहाण करीत होते. दादासाहेब याने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही त्यांनी मारहाण केली.
या मारहाणीमध्ये जखमी सुरेश घोडके यांचा मृत्यू झाला. या दरम्यान संशयित आरोपीने देखील माझ्या आईची छेडछाड केल्याचे पोलिसांना सांगितले.
वैराग पोलीसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून गुरुवारी बार्शी सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी सांगितले
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज