मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा मधील एका बँकेचे ब्रँच मॅनेजर यांना चारचाकीतून बाहेर काढून मारहाण करत सोन्याची चेन, ब्रँडेड मोबाईल असा १ लाख ६० हजारांचा ऐवज चोरी करून पोबारा केला.
संजयनगर पोलिस ठाण्यात संजय सदाशिव खांडेकर (वय ३८, अर्जुनवाड, ता.शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
राहुल महादेव कोळी (साई मंदिरानजीक, ग्रीन पार्क, मिरज) यांनी फिर्याद दिली. राहुल कोळी हे मंगळवेढा येथील बँकेत ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी राहुल कोळी हे मंगळवेढा येथे बँकेत कार्यरत आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास चारचाकीतून त्यांच्या घरी निघाले होते.
त्यावेळी पाठीमागून आलेल्या चालकाने चारचाकीसमोर येऊन दुचाकी थांबवली. अनोळखीने वाहनाचा दरवाजा उघडून फिर्यादी राहुल कोळी यास बाहेर काढले, मारहाण केली.
त्यामुळे राहुल कोळी हॉटेल पालवीच्या दिशेने पळत गेले. त्यानंतर ही व्यक्ती फोनवर बोलत तेथेच थांबली होती. काही वेळाने फिर्यादी राहुल हे चारचाकी घेण्यासाठी पुन्हा तेथे आले.
ते वाहनात बसताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी राहुल यांच्या गळ्यातील चार तोळ्याची चेन, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तिघांनी तेथून पलायन केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
मिरज रोडवर आशा अनेक घटना घडल्या
प्रवाशांनी मिरज रोडवर प्रवास करताना असे काही प्रसंग घडल्यास तात्काळ सावधगिरी बाळगावी व लगेच पोलिसांना कॉल करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज