टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात दिवसभरात सात पोलीस अंमलदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या २२९ पोहचली आहे. दुसरीकडे २६३ कोरोनाबाधित पोलिसांची भर पडली तर ३६३ पोलीस कोरोनामुक्त घरी गेले.
सध्या ३ हजार ५४८ कोरोनाबाधित पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री उशिरापर्यंत राज्यात २१ हजार ५७४ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली होती. त्यात २ हजार ३४२ पोलीस अधिकारी तर १९ हजार २३२ पोलीस कर्मचार्यांचा समावेश होता. २६३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती तर ३६३ पोलीस कोरोनामुक्त झाले आहे.
आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या पोलिसांची संख्या १७ हजार ७९७ झाली आहे.
त्यात १ हजार ८७७ पोलीस अधिकारी आणि १५ हजार ९२० पोलीस कर्मचार्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात ३ हजार ५४८ पोलिसांवर उपचार सुरु आहेत. त्यात ४४२ पोलीस अधिकारी आणि ३ हजार १०६ पोलीस कर्मचार्यांचा समावेश आहे.
सात पोलिसांचा मृत्यू झाला, त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या आता २२९ झाली आहे. मृत पोलिसांमध्ये २३ पोलीस अधिकारी तर २०६पोलीस कर्मचारी आहेत.
दुसरीकडे राज्यात आतापर्यंत ३६० पोलिसांवर जमावाकडून हल्ला झाला असून त्यात ८९५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कोविडसंदर्भात आतापर्यंत १ लाख १३ हजार १७६ कॉल मुख्य नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले आहेत.
लॉकडाऊननंतर राज्यात १ हजार ३४७ अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले असून याच गुन्ह्यांत ३६ हजार ००२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९६ हजार १७७ वाहने जप्त केले आहेत. त्यांच्याकडून २५ कोटी ९९ लाख २२ हजार ९६४ रुपयांचा दंड वसुल केला आहे.
Seven policemen killed by corona in the state; Total death toll at 229
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज