mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भाजपचा नगराध्यक्ष, उमेदवार नगरपालिकेत पाठवा, मंगळवेढा शहराच्या विकासासाठी मागेल तेवढा निधी भाजप सरकारकडून आणणार; आमदार समाधान आवताडे यांनी दिला जनतेला शब्द

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 3, 2025
in मंगळवेढा
भाजपचा नगराध्यक्ष, उमेदवार नगरपालिकेत पाठवा, मंगळवेढा शहराच्या विकासासाठी मागेल तेवढा निधी भाजप सरकारकडून आणणार; आमदार समाधान आवताडे यांनी दिला जनतेला शब्द

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा नगरपालिकेत भाजपचे उमेदवार निवडून पाठवा शहराच्या विकासासाठी मागेल तेवढा निधी भाजप सरकारकडून मिळवून देणार असल्याचा शब्द आमदार समाधान आवताडे यांनी दिला आहे.

ते जोगेश्वरी मंगल कार्यालयात आयोजित भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजप नगराध्यक्ष उमेदवार सुजाता जगताप, प्रांतिक सदस्य राजेंद्र सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित जगताप, प्रा.येताळा भगत, अँड.शिवानंद पाटील, माजी नगराध्यक्ष अशोक माळी, औदुंबर वाडेकर आदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार आवताडे म्हणाले की, मंगळवेढा शहरातील विकासासाठी भाजप सरकारने मोठ्या प्रमाणात आतापर्यंत निधी दिला आहे. आठवडा बाजार सुशोभीकरण, किल्ल्या भागातील महादेव विहीर, नगरपालिकांच्या शाळा बांधकाम, किल्ला संवर्धन, आठवडा बाजार बाथरूम, नाट्यगृहाचे काम सुरू आहे,

येणाऱ्या काळात महात्मा बसवेश्वर स्मारक, संतसृष्टी, चोखोबा स्मारक त्याचबरोबर पाणी, लाईट, यासंदर्भात अधिक लक्ष केंद्रित करून मार्गी लावण्यासाठी मागेल तेवढा निधी उपलब्ध करून देणार आहे.

महात्मा बसवेश्वर स्मारक, चोखोबा स्मारक झाल्यानंतर येथील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे.

मंगळवेढा शहरातील नागरिकांसाठी शंभर बेडचे हॉस्पिटल मंजूर झाले आहे, बस स्थानकाचे सुशोभीकरण करून नागरिकांची गैरसोय दूर केली आहे, साठेनगर, नागणेवाडी परिसरातील नागरिकांचा झोपडपट्टी भाग आदी भाग त्यांच्या नावावर कायमस्वरूपी करून देण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहे.

प्रत्येक मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या सोबत संवाद साधून भाजप सरकारने मंगळवेढा शहरात केलेल्या कामाची यादी सांगावी, आपण टिका न करता वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे असा सल्ला देखील आमदार आवताडे यांनी यावेळी दिला.

माजी आमदार प्रशांत परिचारक बोलताना म्हणाले की, पंढरपूर नगरपालिकेवर भाजपची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ असून पंढरपूर जनतेला माहित आहे विकास कोण करत आहे. त्यामुळे तेथील जनता आमच्या सोबत खंबीरपणे उभी राहिली आहे.

मंगळवेढा नगरपालिकेला भाजप सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे येणाऱ्या काळात राहिलेले कामे पूर्ण करण्यासाठी निधी आणून विकास कसा असतो हे मंगळवेढेकर पाहतील.

मंगळवेढा शहरातील सर्वांगीण विकासाच्या संकल्पनांवर या संवादादरम्यान आपल्या सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण असून भारतीय जनता पक्षाच्या व महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड लोकसमर्थन लाभत आहे. विकासाचा विश्वास आणि पक्षाच्या कार्याचा ठसा जनतेच्या मनात दृढ होत आहे.

त्यामुळे आपण सर्वांनी या निवडणुकीसाठी पूर्णपणे झोकून देत समन्वयाने काम करून विजयाच्या रूपाने यश पदरात पाडून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मी व आमदार समाधान आवताडे सर्व पातळ्यांवर आपल्या सर्वांच्या पाठीमागे पूर्णपणे ताकतीनिशी असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे उमेदवार

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 15, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 13, 2026
Next Post
ऊसाची पहिली उचल 2500 जाहिर करा व अंतीम बिल 3100 द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर ठाम

शेतकऱ्यांनो! कोल्हापुरात उसाला 3500 रुपयांचा दर मिळतो मग सोलापुरातच 2800 का? शेतकरी आक्रमक; 'या' तारखेपासून आमरण उपोषण

ताज्या बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 15, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..