सांगोला शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा कहर हळूहळू कमी होताना दिसत आहे आज एकाच दिवशी 35 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत तर आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे.
आज दि.31 ऑक्टोबर रोजी 15 नागरिकांचे स्वॅब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 113 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट ( RAT ) घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 113 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह- 06 आणि निगेटिव्ह 107 जणांचे अहवाल आलेले आहेत.सदरचे नागरिक हे सांगोला 5 , घेरडी 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेल्या स्वब ( RT – PCR ) चे 02 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. सदरचे नागरिक हे कमलापूर येथील कोरोना रुग्णाच्या निकटतम संपर्कातील आहेत.
सांगोला तालुक्यात आतापर्यंत 2 हजार 383 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 2 हजार 072 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 272 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज