कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण ग्रामीण भागात झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे.त्यातच शनिवारी आलेल्या अहवालानुसार मंगळवेढा तालुक्यात पुन्हा १० करोनाबाधित रूग्णाची वाढ झाली आहे.
शनिवार दि ३१ ऑक्टोंबर रोजी १९ नागरिकांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आलेले आहेत.तसेच शनिवारी ११० रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. ११० रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी ७ पॉझिटिव्ह आणि १०३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.सदरचे नागरिक दामाजी नगर-३,माचणूर-१, मरवडे-१,खोमनाळ-१,सलगर-१
येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेल्या स्वॅब चे ३ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेले आहेत.सदरचे पॉझिटिव्ह नागरिक ढवळस-२, लेंडवे चिंचाळे-१ येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकटतम संपर्कातील आहे.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत १ हजार ४१५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १ हजार ३२४ रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत ५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आतापर्यंत ४० जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्हा प्रशासन व इतर सर्व समन्वयीन यंत्रणा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता चांगल्या प्रकारचे काम करीत आहेत. याबरोबरच नागरिकांनीही याबाबत स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे.
प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या नियमांचे पालन करीत खबरदारी घेतल्यास आपण कोरोनाच्या संकटावर निश्चितपणे मात करु तसेच आगामी काळात यादृष्टीने खबरदारी घेतल्यास व आपले मंगळवेढा तालुका व परिसर लवकरच कोरोनामुक्त होईल तरी नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज