मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरु झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागून राहिलेली होती.
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. यासंदर्भातील माहिती आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे.
लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास काल पासून सुरुवात झाली आहे.
महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.
लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 मे रोजी देण्यात आली होती. त्यानंतर मे महिन्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं.
अकराव्या हप्त्याच्या रकमेसह लाडक्या बहिणींना योजना सुरु झाल्यापासून 16500 रुपये मिळाले आहेत. काही महिन्यांमध्ये दोन महिन्यांची रक्कम लाडक्या बहिणींना एकत्रितपणे देण्यात आली होती. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची रक्कम एकत्रित देण्यात आली होती.
या महिलांना मिळतात केवळ 500 रुपये
लाडक्या बहिणींना सरकार योजनेनुसार 1500 रुपये देतं मात्र ज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 500 रुपयांची रक्कम दिली जाते. मे महिन्याच्या हप्त्यासह 11 हप्त्यांची रक्कम महिलांना मिळाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज