मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यभरात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची चर्चा असतानाच आता सोलापुरमध्ये देखील सासरच्या जाचाला कंटाळून आशाराणी भोसले या 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणात देखील चारचाकी आणि पैशाच्या हव्यासासाठीच सासरकडच्यांनी सुनेचा छळ केल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे.
मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथील विवाहितेच्या आत्महत्त्या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी आशाराणी भोसले हिचा मृत्यू नसून हत्या असल्याचा आम्हाला संशय आहे, असंही तिच्या माहेरच्यांनी म्हटलं आहे.
कुटुंबियांनी याबाबत बोलताना सांगितलं की, मोठी मुलगी उशारणी हिचा ज्ञानेश्वर भोसले याच्याशी 2019 मध्ये विवाह झाला होता.
त्यानंतर त्याचा लहान भाऊ पवन यांनी आमची धाकटी मुलगी आशाराणी हिला पळवून नेलं आणि प्रेमाविवाह केला.
मात्र मुलगी झाल्यापासून तीचा छळ सुरूच होता. अनेक वेळा तिच्या कुटुंबियांना व्हिडीओ कॉल करत आशाराणी हिला मारहाण केली जात होती. आशाराणी माहेरी निघून आल्यावर पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांनी समजून सांगितल्याने आम्ही मुलीला नांदायला पाठवलेलं होतं. मंगळवारी तिने टोकाचा पाऊल उचललं. तिला तीन वर्षांची वैष्णवी नावाची चिमुकली मुलगी आहे, अशी माहिती देखील आशाराणीच्या कुटुंबियांनी दिली आहे.
पळवून नेऊन लग्न, मुलगी झाल्यानंतर त्रास
आशाराणीच्या मोठ्या बहिणीच्या दीराने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. दोघांनी पळून जाऊन लग्न देखील केलं. मात्र, मुलगी झाल्यापासून तीचा छळ सुरू होता. अनेक वेळा तिच्या माहेरच्यांना व्हिडीओ कॉल करत आशाराणी हिला मारहाण केली जात होती, अशी संतापजनक माहिती देखील समोर आली आहे.
बहीण देखील माहेरी
आशाराणी भोसले हिची मोठी बहीण उशाराणी हिचा विवाह मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथे राहणाऱ्या ज्ञानेश्वर भोसले यांच्याशी 2019 साली झाला. त्यावेळी धाकटी मुलगी आशाराणी आणि ज्ञानेश्वर यांचा धाकटा भाऊ पवन यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. पवन यांने आशाराणी हिला पळवून नेत तिच्याशी विवाह केला.
लग्नानंतर दोन वर्षानी आशाराणी हिला मुलगी झाली. वैष्णवी असे या मुलीचे नावं आहे. वैष्णवीच्या जन्मनंतर आशाराणीचा छळ सुरू झाला. चारचाकी कार हवी, खर्चासाठी पैसे हवे यासाठी सातत्याने तीचा छळ सुरु झाला. दोन वेळा तर मुलीच्या आई वडिलांना व्हिडीओ कॉल करून देखील पवन याने मारहाण केली.
2024 साली मारहाण सहन न झाल्याने आशाराणी ही माहेरी रायचूरला निघून आली. तेव्हा पत्नी नांदायाला येतं नाही म्हणत पवन याने पोलिसात तक्रार दिली. महिला तक्रार निवारण केंद्राने दोन्ही कुटुंबियांची समजूत घातली. त्यानंतर आशाराणी हिला पुन्हा नांदवण्यास पाठवण्यात आलं. मात्र वर्षाभराच्या आत ही दुर्दैवी घटना घडली.
आत्महत्या झाल्यापासून मृत अशाराणी हिची तीन वर्षांची मुलगी वैष्णवी ही सासरच्या ताब्यात होती. आता काही वेळा पूर्वी वैष्णवीला आशाराणी यांच्या माहेच्या कुटुंबियांना देण्यात आलं आहे.
मयत आशाराणी हिची मोठी बहीण उशारणी हिला देखील सासरमध्ये असाच त्रास सुरु आहे. त्यामुळे दोन महिन्यापासून ती देखील रायचूर येथे माहेरी आहे.
पैसे आणि चार चाकी वाहनासाठी छळ
सासरच्या मंडळींनी पैसे आणि चार चाकी वाहनासाठी छळ केल्यानेचं मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याची मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे. (मंगळवारी) मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथे राहणाऱ्या आशाराणी पवन भोसले या 22 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केली होती.
मृत आशाराणी भोसले हिला अवघ्या तीन वर्षांची चिमुकली मुलगी असून ती दुसऱ्यांदा गर्भवती होत्या. 2019 साली आशाराणी हिचे मोहोळ तालुक्यातील पवन भोसले याच्याशी विवाह झाला होता. तर आशाराणीची बहीण उशाराणी हिचा विवाह देखील पवन भोसले याच्या भावासोबत ज्ञानेश्वर सोबत झाला आहे.
सासू अलका आणि सासरा बलभीम भोसले त्रास द्यायचे
मागील तीन वर्षांपासून आशाराणी हिला नवरा पवन हा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासासाठी माहेरहुन पैसे आण म्हणून मारहाण करत होता. तर सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे देखील मुलीला स्वयंपाक नीट करता येतं नाही, मुलाला इज्जत देतं नाही असे म्हणत मानसिक छळ करतं होते.
2024 मध्ये देखील पती पवन याने आशाराणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवलं होतं. त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीने पती पत्नीचे समुपदेशन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देखील पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देणं सुरूच होते.
त्यामुळेच मुलगी आशाराणी भोसले हिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची फिर्याद आशाराणीचे वडील नागराज डोणे यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मृत आशाराणीचे पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छोट्या छोट्या कारणांवरून वाद
चार चाकी वाहन घेण्याकरता आणि इतर खर्चासाठी माहेरवरून पैसे घेऊन ये. तुला नीट स्वयंपाक करता येत नाही. तू नवऱ्याची इज्जत करत नाही, असं म्हणून तिचा वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याप्रकरणी नवरा पवन भोसले, सासू अलका भोसले व सासरा बलभीम भोसले यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशाराणी भोसले प्रकरणतील तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरे बलभीम भोसले या तिघांना पोलिसांनी अटक केली आहेत. चारचाकी गाडी आणि खर्चासाठी पैसा पाहिजे म्हणून पती पवन हा सातत्याने छळ करतं असल्याने आशाराणी हिने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे.
या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात पवन भोसले, अलका भोसले, बलभीम भोसले या तिघां विरोधात BNS कलम 80(2), 115(2),3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच नवरा पवन भोसले याला पोलिसांनी अटक केली होती, त्यानंतर आरोपी सासू आणि सासऱ्याला देखील आता पोलिसांनी अटक केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज