मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सांगोला तालुक्यातील अचकदाणी महूद रोडवर दुचाकी अपघातात रस्त्यावर पडून गंभीर जखमी झालेल्या वृद्ध मातेचा सोलापुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पित्याने फिर्याद दिली असून मुलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रुक्मिणी सोमनाथ कर्चे (वय ६१, रा. महूद, ता. सांगोला) असे मृत वृद्ध महिलेचे नाव असून हा अपघात रविवार १ जून रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास अचकदानी महूद रोडवर शंकर काटे यांच्या शेताजवळ झाला.
याबाबत मुलाचे वडील सोमनाथ संभाजी कर्चे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी मुलगा अनिल सोमनाथ कर्चे (दोघेही रा. महद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१ जून रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास मुलगा अनिल हा वृद्ध आई रुक्मिणी हिला दुचाकी (एम. एच. १२ /जी.बी. ३०९) वर बसवून अचकदाणीहून महूदकडे निघालेला होता.
घरापासून १ किमी अंतरावर समोरून काहीतरी आडवे आल्याने अचानक ब्रेक दाबला आणि समोर असलेल्या दुचाकी (एम. एच. ४५/वाय. ४०२०) जोरात धडकले. या अपघातात रुक्मिणी रस्त्यावर पडल्या आणि डोक्याला मार लागला. त्या बेशुद्ध पडल्या.
फिर्यादी पती सोमनाथ कर्चे यांनी पत्नी रुक्मिणी हिला उपचारासाठी खासगी वाहनाने पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ४ जून रोजी रात्री ९:३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज